धारक परत करणार केशरी रेशनकार्डे
By Admin | Updated: February 22, 2016 00:20 IST2016-02-22T00:20:30+5:302016-02-22T00:20:30+5:30
तहसीलदार व पुरवठा विभागातील हलगर्जीपणामुळे तालुक्यातील अत्यंत गरीब दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबानाही केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.

धारक परत करणार केशरी रेशनकार्डे
- हुसेन मेमन, जव्हार
तहसीलदार व पुरवठा विभागातील हलगर्जीपणामुळे तालुक्यातील अत्यंत गरीब दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबानाही केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारचे धान्य व रॉकेल मिळत नाही. त्यांचा फक्त रहिवासी पुरावा म्हणून उपयोग होत आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांनी त्या पुरवठा विभागात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जव्हार तालुक्यात १ हजार ५६३ च्या अधिक केशरी शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत. हे लाभार्थी अत्यंत गरीब व दारिद्य्र रेषेखालील असूनही त्यांना हे केशरी कार्ड दिले आहे. या कार्डावर रेशनिंग धान्य दुकानात धान्य मिळत नाही. फक्त या काडार्चा उपयोग पुरावा म्हणून होत आहे. या कारणासाठी उपयुक्त ठरणारे अन्य अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. मग याची गरच काय त्यामुळे हे काहीच कामाचे नसलेले केशरी कार्ड शासनाने परत घ्यावे, असे केशरी शिधापत्रिका धारकांची म्हणणे आहे. (वार्ताहर)़
केशरी कार्डावर रेशनिंग दुकानातून काहीच धान्य दिले जात नाही. म्हणून हे कार्ड काहीच उपयोगाचे नाही. आम्ही हे केशरी कार्ड जमा करू, व तहसीदारांनी घेतले नाही. तर काडार्ची होळी करू.
- रमेश जंगली, केशरी शिधापत्रिका प्रमुख