शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पालकमंत्र्यांच्या दणक्याने खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:23 AM

सतत वीज जाणे किरकोळ कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होणे वीज बिल भरण्यासाठी २०/३० किमीची पायपीट या सगळ्या अडचणी लक्षात घेवून खोडाळासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र व्हावे, अशी मागणीजोर धरत होती.

मोखाडा : सतत वीज जाणे किरकोळ कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होणे वीज बिल भरण्यासाठी २०/३० किमीची पायपीट या सगळ्या अडचणी लक्षात घेवून खोडाळासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र व्हावे, अशी मागणीजोर धरत होती. तशी मंजुरीही मिळाली. मात्र तरीही कासवगतीने ही प्रक्रि या सुरू होती. ही बाब भाजपचे उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी नवनियुक्त पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चव्हाण यांनी तत्काळ तहसीलदारांना आदेश देवून अवघ्या तासाभराच्या आत सातबारा उपलब्ध करुन दिला. ही जागाही महावितरणाच्या नावावर झाली असून वनविभागालाही आडकाठी न आणण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आता या केंद्राच्या कायदेशीर अडचणी सुटल्या असून पहिल्याच दणक्यात पालकमत्र्यांनी ही अडचण सोडवल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.मोखाडा तालुक्यात मोखाडा आणि खोडाळा असे प्रशासकीय दोन विभाग आहेत मोखाडा मुख्यालयापासून तब्बल २० कि.मी.हून अधिक अंतर कापून खोडाळा येथे जावे लागते अशी स्थिती आहे. यामुळे तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाचा उपविभाग खोडाळा येथे आहे. मात्र महत्त्वाचा असलेल्या महावितरणचे या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नव्हते. यामुळे मोखाड्याहून खोडाळा शहर आणि त्यापलीकडे तब्बल १०/१३ कि.मी.पर्यंतच्या गावपाड्यांना ही वीज पुरवली जात होती. यामुळे जुन्या तारा वाकलेले पोल कमी दाबाची वीज अशा असंख्य अडचणीने खोडाळाकर हैराण होते. याबाबत खोडाळ्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र द्यावे, अशी मागणी होती. हे केद्र मंजुरही झाले होते. मात्र कायदेशीर कचाट्यात ते अडकलेले असल्याने होवू शकलेले नव्हते.>पालकमंत्री असावा तर असा, जनतेकडून चव्हाणांचे कौतुकयाबाबत मोखाडा या ठिकाणी पालकमंत्री चव्हाण यांनी तातडीने पाउले उचलून सातबारा आणि बाकी परवानग्या अशा किरकोळ कामांना एवढा उशीर लागतोच कसा? या भाषेत खडसावले तर कागदोपत्री कार्यवाही करत बसा मात्र ते काम आत्ताच्या आता सुरू करा तशा सूचना ठेकेदाराला द्या, असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांच्या या दणक्याने महिनोन्महिने रखडलेले काम त्याच दिवशी तासाभरात झाल्याने पालकमंत्री असावा तर असा अशी चर्चा तालुक्यात रंगली होती. यामुळे आता लवकरच खोडाळावासीयांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे.