विकासाचा मुद्दा ठेवत निवडणूक जिंकून गावितांना केंद्रात पाठवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:21 IST2018-05-26T02:21:52+5:302018-05-26T02:21:52+5:30
स्मृती इराणी; डहाणू येथील सभा गर्दी नसल्याने दोन तास उशीरा सुरू

विकासाचा मुद्दा ठेवत निवडणूक जिंकून गावितांना केंद्रात पाठवू
डहाणू : पालघर लोकसभा पोटनिवडणूक हा सत्तेसाठीचा वाद आहे. अमरनाथ यात्रेमध्ये डहाणूकरांनी दाखवलेली एकजूट पुन्हा एकदा दाखवून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून देण्याचे आवाहन स्मृती इराणी यांनी शुक्रवारी डहाणू येथे आयोजित केलेल्या सभेत केले. विकासाचा मुद्दा ठेवून ही निवडणूक जिंकून गावितांना केंद्रात पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डहाणू नगर परिषदेत रामवाडी येथे सभा घेण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे लोक न जमल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली.
भाजपाने गरीब जनतेच्या विकासासाठी ४ वर्षांत ३१ कोटी लोकांनी जनधन योजनेद्वारे बँकेत खाती उघडली. उज्ज्वला योजनेद्वारे ३.५ कोटी महिलांना मोफत गॅस दिले. मच्छीमारांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. सभेला भाजपाचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित, राज्यमंत्री विद्याताई ठाकूर, आ. मनीषा चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. पास्कल धनारे, माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील, माधवी नाईक, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.