स्वप्न उंच ठेव, यशाची कवाडे उघडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:40 IST2018-06-24T23:40:06+5:302018-06-24T23:40:16+5:30
कर्नाटक राज्यातील एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्याचा मी मुलगा आज पालघर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून आपणासमोर उभा आहे

स्वप्न उंच ठेव, यशाची कवाडे उघडतील
वसई : कर्नाटक राज्यातील एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्याचा मी मुलगा आज पालघर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून आपणासमोर उभा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आयुष्यात उंच स्वप्न ठेवा, ते स्वप्न साकार करण्यासाठी योग्य नियोजन करून परिश्रम करुन पहा, यशाचे सर्व मार्ग मोकळे होतील असे उद्गार मंजुनाथ सिंगे यांनी विरार मधील एका कार्यक्र मात काढले,
बुधवारी विरार पश्चिमेतील पद्मावती सभागृहात पालघर पोलीस दला तर्फे पोलीस कुटुंब मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या कुटुंबाला ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या मेळाव्यात मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी -बारावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादित करणाºया पोलिसांच्या मुलांचा पोलीस अधीक्षक सिंगे यांच्या वसत्कार करण्यात आला. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, पोलीस उपाधीक्षक जयवंत बजबले, दत्ता तोटेवाड, डॉ. अश्विनी पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान हा आठवडा ‘पोलीस कुटूंब कल्याण आठवडा’ असणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले. तसेच ड्यूटीच्या ताणतणावातून बाहेर पडता यावे या कार्यक्र माचे आयोजन केले होते.