काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी केदार काळे

By Admin | Updated: May 6, 2017 05:07 IST2017-05-06T05:07:43+5:302017-05-06T05:07:43+5:30

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण ह्यानी केदार काळे ह्याची नियुक्ती पालघर जिल्हा कॉग्रेसच्या जिल्हा

Kedar Kale as District President of Congress | काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी केदार काळे

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी केदार काळे

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण ह्यानी केदार काळे ह्याची नियुक्ती पालघर जिल्हा कॉग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी केली आहे. केदार काळे ह्यानी मागील १२ वर्षात पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पद, प्रवक्ते व प्रदेश कॉग्रेसचे सचिव , प्रदेशातील विभाग व सेल चे प्रभारी इत्यादी पदे भूषिवली आहेत.
माजी खासदार दामोदर शिंगडा ह्याच्या लोकसभा निवडणूकीत प्रचार प्रमुख, माजी राज्यमंत्री राजेद्र गवितांच्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारांचा निवडणूक प्रतीनिधी, कॉग्रेसच्या अनेक कार्यक्र माचे आयोजनाची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे. त्यांनी पालघर सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्षपद ठाणे जिल्हा हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर सभा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या इमारत व ईत्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे संचालक म्हणून काम केले आहे . तसेच पालघरच्या आर्यन एज्युकेशन सोसायटी चे प्रेसिडेंट म्हणून काम केले आहे. अनेक सामाजिक प्रश्न त्यानी पोटतिडकीने मांडले आहेत, अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. ते विज्ञान शाखेचे पदवीधर असून शिक्षक म्हणून त्यानी काही वर्ष काम केले आहे . त्याच्या पत्नी डॉ.उज्ज्वला काळे ह्या काँग्रेस च्या चार वेळा नगरसेवक म्हणून पालघर नागरपरिषदेवर निवडून आल्या असून सध्या त्या एकमेव काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्याच्या नियुक्तीने कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून कॉग्रेसच्या कठीण काळात संघटनेला बळ देणारा अध्यक्ष मिळाल्याच्या भावना काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Web Title: Kedar Kale as District President of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.