काशीमीरा येथे ९ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:31 IST2021-07-19T19:31:34+5:302021-07-19T19:31:44+5:30
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास काशीमीरा भागातील मुंशी कंपाऊंड मधील अबू रहमान हा ९ वर्षाचा मुलगा नाल्यावरील कठड्यावरुन चालत जात असताना पाय घसरून पडला.

काशीमीरा येथे ९ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - काशीमीरा येथील मुंशी कंपाऊंड येथील नाल्यात पडून ९ वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. सायंकाळ पर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास काशीमीरा भागातील मुंशी कंपाऊंड मधील अबू रहमान हा ९ वर्षाचा मुलगा नाल्यावरील कठड्यावरुन चालत जात असताना पाय घसरून पडला. मुसळधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्यात पडताच तो वाहून गेला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी मुंशी कंपाऊंड मधील नाल्या पासून पुढील नाल्याच्या ठिकाणी सुद्धा शोधाशोध चालवली. परंतु पाण्याचा वेग पाहता मुलगा कुठे सापडला नाही.
या नाल्याच्या लागत झोपडपट्टी असून नाल्याला संरक्षित जाळ्या नसल्याने लहान मोठे सर्रास नाल्याच्या सभोवताली वावरत असतात.