शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलच्या विजयाचे शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 02:27 IST

शेवटी प्रत्युत्तर देण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एकाबाजूने आर टी रेजिमेंट ने ‘बोफोर्स तोफांचा’ मारा केला दुसरीकडून वायुसेनेने शत्रूंनी ताब्यात घेतलेल्या सर्व चौक्यांवर जोरदार हल्ला करण्यास सुरु वात केली.

शेवटी प्रत्युत्तर देण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एकाबाजूने आर टी रेजिमेंट ने ‘बोफोर्स तोफांचा’ मारा केला दुसरीकडून वायुसेनेने शत्रूंनी ताब्यात घेतलेल्या सर्व चौक्यांवर जोरदार हल्ला करण्यास सुरु वात केली. शत्रुने शरणागती पत्करल्यानंतरच ते थांबले. त्यानंतर भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देत सैनिकांनी उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा फडशा पाडला.मूळचे पालघरचे रहिवासी असलेले भाऊराव तायडे देशप्रेमाने प्रेरीत होऊन सैन्यात दाखल झाले. ३ मे १९९९ रोजीे भारताच्या ताब्यातील कारगील प्रांतात पाकिस्तानच्या सेनेने घुसखोरी केल्याची माहिती भारतीय सेनेला प्रथम मिळाल्या नंतर ५ मे रोजी भारतीय सेनेच्या पेट्रोलिंग साठी गेलेल्या टीम मधील ५ सैनिकांची पाकिस्तानी सैनिकांनी निर्घृण हत्या केली. त्यानंतर पाकिस्तान कडून कारिगल युद्धाला सुरु वात केली. ९ मे रोजी त्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे दारूगोळ्याचे कोठार नष्ट झाले. त्यानंतरही पाकिस्तान सैनिकांच्या कारवाया सुरूच राहिल्याने अखेर २६ मे ला भारतीय सैनिकांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आणि प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे आपल्या मुलीच्या उपचारासाठी दोन महिन्यांच्या सुट्टीवर आलेल्या तायडे यांना तात्काळ कारगिल मध्ये हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले. तेव्हा माझ्या मुलीवर कांदिवली च्या एका रुग्णालयात पाठीच्या कण्याची दहा तासांची शस्त्रक्रि या सुरू झाली होती. एका बाजूला देशाचे संरक्षण तर दुसरी कडे कन्येप्रति पित्याचे कर्तव्य अशा कात्रीत ते सापडले. मात्र त्यांनी देशाच्या रक्षणाच्या प्रथम प्राधान्य देऊन कन्येवरील शस्त्रक्रि येची जबाबदारी पत्नी व नातेवाईकावर सोपवून ते कारिगल कडे रवाना झाले.दोन दिवसांच्या प्रवासा नंतर मीे द्रास सेक्टर ला हजर झालो. तो पर्यंत भारतीय जवानांनी हे सेक्टर पाकिस्तानी सैनिकांकडून पुन्हा ताब्यात घेतले होते. २ महार रेजिमेंट मध्ये ३६ जवानांचा सहभाग असलेल्या टीम चा ताबा माझ्याकडे रेजिमेंट प्रमुख कर्नल आर के शर्मा ह्यांनी दिल्या नंतर मी या जवानांसह युध्द भूमीकडे कूच केली. उणे ४८ अंश सेल्सिअस अशा जीवघेण्या थंडीत अंगावर बर्फ साचत असलेल्या वातावरणातून आम्ही पुढे जात होतो तेव्हा आम्हाला पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या भारतीय चौकीच्या दिशेने जाण्याचा आदेश देण्यात आला. रात्रीचा अंधार कापीत आम्ही पुढे जात असतांना आमच्या दिशेने गोळीबार व्हायला सुरु वात झाली. प्रत्युत्तर म्हणून गोळी झाडण्याचे आदेश नसल्याने आमच्या पुढे शांत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आमच्याच भूभागावर जबरदस्तीने कब्जा करणाऱ्या आणि आमच्या सैनिकांची निघृण हत्या करणाºयांना यमदसनी पाठविण्यासाठी आमचे हात शिवशिवत असतांना वरिष्ठांचा फायरचा आदेश नसल्याने आमचे हात बांधले गेले होते. त्याच वेळी पाकिस्तानी सैनिकांनी डोंगरावरून आम्ही असलेल्या भागात मोठमोठे दगड लोटून देण्यास सुरु वात केली. त्या दरम्यान सपाट प्रदेश असल्याने बचावासाठी आमच्या समोर काहीही आडोसा नसल्याने अशा दगडांखाली सापडून आमचे दोन सैनिक शहीद झाले. त्या परिस्थितीत आम्ही अनेक तास एकाच ठिकाणी पडून होतो. त्यानंतर आम्ही काही वेळ थांबुन हळूहळू पुढे पुढे सरकत असतांना आमच्या एका सहकारी सैनिकांच्या खांद्यावरील बॅग वरची एक वस्तू चमकल्याने आमचा ठिकाणा शत्रूला कळला. त्याने वरून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आमचे नाशिक, मनमाड, सांगली आणि सातारा येथील ५ जवान शहीद झाले. त्यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिल्यानंतर प्रत्युत्तरा दाखल गोळीबार न करण्याचा आदेश देणाºया वरिष्ठांचा आम्हाला भयंकर संताप येत होता पण आमचा नाईलाज होता.शब्दांकन - हितेन नाईक

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानVasai Virarवसई विरार