शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये कालिदास हिरवे पहिला, १२ व्या मनपा मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 18:37 IST

२१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुषांमधून रोहित वर्मा आणि महिलांमध्ये सोनिका विजेते

नालासोपारा (मंगेश कराळे) :- स्पर्धकांचा वाढता सहभाग व वसईच्या निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अविस्मरणीय अनुभव त्याचबरोबर गुणवान युवा धावपटूंना वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणारी बारावी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी वसईत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वसई येथे फ्लॅग ऑफ करून मोठ्या उत्साहात आणि आनंदात शुभारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चभ्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये ५८ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.

स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ती साताऱ्याच्या कालिदास हिरवेने. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनमध्ये कालिदास हिरवेने २ तास १८ मिनिटे १९ सेकंदांच्या वेळेसह धाव पूर्ण करीत विजेतेपद पटकावले. त्यांना बक्षीस म्हणून तीन लाख रुपये मिळाले. हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला, परंतु त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. हिरवे यांच्या पाच सेकंद मागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला. दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोडने २ तास १९ मिनिटे ६ सेकंदसह तिसरे स्थान पटकावले. तर पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नौदलाच्या रोहित वर्माने नितेश रथवाला केवळ 1 सेकंदाने मागे टाकत अव्वल दोन स्थानांसाठी फोटो-फिनिश केले. उल्लेखनीय म्हणजे, अव्वल पाच धावपटूंनी २०१९ मध्ये अनिश थापाने सेट केलेला १ तास ४ मिनिटे ३७ सेकंदचा कोर्स रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडून काढला आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील नोंदवली. वर्मा यांना बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले.

सोनिका या हरियाणातील एका शेतकऱ्याची मुलगी आणि रेल्वे कर्मचारी आहे. तीने महिलांची अर्ध मॅरेथॉन १ तास १३ मिनिटे २२ सेकंदसह जिंकली. सोनिकाला बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले. हा केवळ एक कोर्स रेकॉर्ड नाही तर तिची वैयक्तिक सर्वोत्तम देखील आहे. उजालाच्या नावावर जुना विक्रम १ तास १३ मिनिटे ३३ सेकंद हा होता. जो तीने २०२२ मध्ये स्थापित केला होता. हरियाणाची भारती १ तास १३ मिनिटे ५१ सेकंदसह दुसऱ्या तर साक्षी जड्याल १ तास १४ मिनिटे ५१ सेकंदसह तिसऱ्या स्थानावर राहिली.

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती साक्षी मलिक जिने १५ हजार धावपटूंना या स्पर्धेची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झेंडा दाखवला. या स्पर्धेत विविध वयोगटातील सहभागींचा उत्साह पाहून मी स्तब्ध झाले. अशा कार्यक्रमांमध्ये तरुण आणि वृद्ध सहभागी होत आहेत हे चांगले आहे. प्रत्येकाने एक खेळ उचलणे आणि एखाद्याच्या कल्याणासाठी त्याचा पाठपुरावा करणे महत्वाचे असल्याचे साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली. तीने सर्व पदक विजेत्यांचे तसेच सहभागींचे  अभिनंदनही केले.

१) मी येथे धावणे अनिश्चित होते आणि वसईतील एका मित्रासोबत मी ४२ किमी अंतराचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले होते. परंतु शेवटच्या क्षणी मी माझा विचार बदलला आणि या स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला. - कालिदास हिरवे

२) हा स्पर्धा मार्ग आवडतो. चांगल्या हवामानामुळे धावणे सोपे झाले आणि मला कोणतीही अडचण आली नाही. - रोहित वर्मा

३) ही एक चांगली शर्यत होती आणि गतविजेती प्राजक्ता गोडबोले (थकलेली म्हणून सहभागी झाली नाही) असती तर स्पर्धा अधिक चांगली झाली असती. - सोनिका

मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल

४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा

१) कालिदास हिरवे – २ तास १८ मिनिटे १९ सेकंद२) प्रदीपसिंह चौधरी - २ तास १८ मिनिटे २४ सेकंद ३) मोहित राठोड - २ तास १९ मिनिटे ०६ सेकंद४) धनवत रामसिंग - २ तास १९ मिनिटे ४९ सेकंद५) अमित पाटील - २ तास २५ मिनिटे १३ सेकंद

अर्ध मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष )

१) रोहित वर्मा – १ तास ३ मिनिटे १२ सेकंद२) नितेशकुमार रथवा - १ तास ३ मिनिटे १३ सेकंद३) दीपक कुंभार – १ तास ३ मिनिटे १६ सेकंद४) रिंकू सिंग – १ तास ०४ मिनिटे ०७ सेकंद५) शुभम सिंधू – १ तास ०४ मिनिटे १३ सेकंद

अर्ध मॅरेथॉन महिला

१) सोनिका - १ तास १३ मिनिटे १२ सेकंद २) भारती - १ तास १३ मिनिटे ५१ सेकंद ३) साक्षी जड्याल - १ तास १४ मिनिटे २१ सेकंद४) अर्चना जाधव - १ तास १४ मिनिटे ५० सेकंद५) तमसी सिंग - १ तास १६ मिनिटे ३६ सेकंद

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरार