जव्हार बस स्थानकाच्या दुरुस्तीला सुरुवात
By Admin | Updated: September 10, 2015 23:49 IST2015-09-10T23:49:46+5:302015-09-10T23:49:46+5:30
येथील बसस्थानकाच्या इमारती चे बांधकाम हे फार वर्षापूर्वी करण्यात आले होते. अत्यंत जीर्ण झालेल्या या स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे आसन व्यवस्थेची दुरावस्था होती, छताचे पत्रे

जव्हार बस स्थानकाच्या दुरुस्तीला सुरुवात
जव्हार : येथील बसस्थानकाच्या इमारती चे बांधकाम हे फार वर्षापूर्वी करण्यात आले होते. अत्यंत जीर्ण झालेल्या या स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे आसन व्यवस्थेची दुरावस्था होती, छताचे पत्रे कित्येक वर्ष बदलले नसल्यामुळे ते अनेक ठिकाणी फुटलेले होते, भिंती कधीही कोसळतील अशा होत्या, वाहतूक नियंत्रण कक्ष, स्थानक प्रमुख व कार्यालयीन कक्ष त्यातच कार्यरत होते. त्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष होता. जव्हार प्रवासी संघटनेने वेळोवेळी पालघर विभागातील तत्कालीन विभाग नियंत्रक यांच्याकडे बसस्थानकाच्या तात्काळ दुरूस्तीबाबत पाठपुरावा केला.
पालघरचे विभाग नियंत्रक मोरे यांनी आॅगस्ट महिन्यात बांधकाम अभियंत्यांसह या बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानक प्रमुख व्ही. जी. रांगसे यांच्याकडून दररोज असणाऱ्या प्रवाशांची सरासरी माहिती घेतली. डहाणू, पालघर, विक्रमगड येथील प्रवाशांना नाशिक अथवा सिल्व्हासा येथे जाण्यासाठी व मोखाडा, खोडाळा व परिसरातल्या प्रवाशांना ठाणे, मुंबई, पालघर, डहाणू येथे जाण्यासाठी या मार्गेच जावे लागत असल्यामुळे या स्थानकात नेहमीच गर्दी असते. हे लक्षात येताच मोरे यांनी १५ दिवसात पहिल्या टप्प्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे दि. ९ सप्टें. रोजी लोखंडी शेड, पुढील पत्रे बदलणे व अत्यावश्यक कामाचा शुभारंभ स्थानक प्रमुख रांगसे, कामगार संघटना सचिव एच. जी. भोये, ठेकेदार अनिल तामोरे व मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.