केवळ दैव बलवत्तर म्हणून...
By Admin | Updated: August 16, 2015 23:12 IST2015-08-16T23:12:33+5:302015-08-16T23:12:33+5:30
शिरवली पूर्णांकपाडा येथे बुधवारी पहाटे ४ वा. घरात लोखंडी सळईचा ट्रक घुसून अपघात झाला. चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तो मार्गावरून उतरून कारवीच्या

केवळ दैव बलवत्तर म्हणून...
पारोळ : शिरवली पूर्णांकपाडा येथे बुधवारी पहाटे ४ वा. घरात लोखंडी सळईचा ट्रक घुसून अपघात झाला. चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तो मार्गावरून उतरून कारवीच्या घराला धडकला. ट्रक वेगात असल्यामुळे धडक एवढी भयंकर होती की, तो ट्रक पूर्ण घरच घेऊन गेला. मात्र घरामध्ये साखर झोपेत असलेल्या शांती काटेला (५०) व साखरी चव्हाण (५१) या दोघी त्यातून बचावल्या.
पण सांगतात ना देव तारी त्याला कोण मारी या वाक्याप्रमाणे त्या झोपल्या होत्या त्याच स्थितीत त्या असल्यामुळे जेव्हा ट्रक घरात घुसला तेव्हा घर तर पूर्ण उध्वस्त झाले. परंतु, त्या दोघी टायरच्या मधल्या जागेत झोपलेल्या अवस्थेत असल्याने आश्चर्यकारकरित्या बचावल्या. या अपघातात त्यांना दुखापत झाली पण प्राण त्यांचा मात्र वाचला. या अपघातातील दोन्ही स्त्री निराधार असल्यामुळे त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत व निवाऱ्याची सोय अपघातग्रस्त ट्रकच्या मालकांनी करावी, अशी मागणी शिरवली ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)