डेंग्यूबाबत जव्हार न.प.चे हातावर हात

By Admin | Updated: February 4, 2017 02:47 IST2017-02-04T02:47:47+5:302017-02-04T02:47:47+5:30

नगर परिषद कार्यक्षेत्रांत डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून येत असल्याचे पत्र कुटीर रूग्णालयाने दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली

Juphar hands on hand for dengue | डेंग्यूबाबत जव्हार न.प.चे हातावर हात

डेंग्यूबाबत जव्हार न.प.चे हातावर हात

जव्हार : नगर परिषद कार्यक्षेत्रांत डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून येत असल्याचे पत्र कुटीर रूग्णालयाने दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. घराच्या आजूबाजूला साठलेल्या पाण्यात या डासाच्या आळ्या वाढत असल्याने पालिकेकडून जनजागृतीची मोहिम हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी दि. १७ डिसेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन डेंग्युचे नवापाडा येथे १ रूग्ण व डॅम आळी येथे २ रूग्ण आढल्यामुळे उपाय योजना करण्याचे सुचविले होते, मात्र पालिकेने या गंभीर आजारावर कुठलीही उपाय योजना केलेली नाही.
जव्हार नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये धूर फवारणीची मागणी होत असून सायंकाळच्या वेळी ती झाल्यास हिवतापाच्या (मलेरिया) मच्छरांना त्यामुळे पायबंद बसतो. डेंग्यूच्या डासांचा हल्ला साधारण पहाटे व सकाळच्या वेळी असतो. मात्र, त्याला काही शास्त्रीय आधार नाही. एकंदर त्यासाठी फक्त नागरिकांमध्ये जनजागृती करुन रहिवाशीभागांमध्ये उघड्यावर टाकलेले शहाळ, टायर, बाटल्या, पाण्याने भरलेल्या व वापरात नसलेल्या टाक्यांतील पाण्यात डेंग्यूच्या डासांची वाढ होते.
त्यामुळे पाणी बदलणे तसेच स्वच्छता हाच त्यावरील उपाय आहे असे, जव्हारचे मुख्याधिकारी
वैभव विधाते यांनी लोकमतला दिली. (वार्ताहर)

आम्ही कुटीर रूग्णालयाने कळविलेल्या रूग्णांच्या घरी जाऊन लिक्विड फवारणी केली आहे. यापूर्वीही आम्ही दवंडी दिली होती व पत्रकेही वाटली होती. तसेच आम्ही शुक्रवारपासून पुन्हा दवंडी देणार आहोत.
- वैभव विधाते, मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद, जव्हार

Web Title: Juphar hands on hand for dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.