पुन्हा जोशी-बेडेकरची बाजी!

By Admin | Updated: October 1, 2014 01:23 IST2014-10-01T01:23:53+5:302014-10-01T01:23:53+5:30

बहुचर्चित आणि युवांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘आयएनटी’ स्पर्धेत पुन्हा एकदा ‘जोशी- बेडेकर’ महाविद्यालयाने बाजी मारली आहे.

Joshi-Bedekar again! | पुन्हा जोशी-बेडेकरची बाजी!

पुन्हा जोशी-बेडेकरची बाजी!

>मुंबई : बहुचर्चित आणि युवांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘आयएनटी’ स्पर्धेत पुन्हा एकदा ‘जोशी- बेडेकर’ महाविद्यालयाने बाजी मारली आहे. या महाविद्यालयाची ‘मोजलेम’ ही सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली.
स्पर्धेचा अंतिम निकालाचा दिवस असल्याने यशवंतराव चव्हाण सेंटर महाविद्यालयीन विद्याथ्र्यानी भरून गेले. आपापल्या कॉलेजच्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध घोषवाक्ये कानावर पडत होती. रंगकर्मीसह उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह आणि उत्सुकता शिगेला पोहोचली. अंतिम स्पर्धेचे परीक्षक म्हणून अच्युत देशिंगकर, मिलिंद शिंदे, चारुशीला साबळे- वाच्छानी, राजन भिसे आणि सुहास जोशी हे मान्यवर उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय पारितोषिक चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयाच्या ‘द आऊट बस्र्ट’ या एकांकिकेला मिळाले, तर तृतीय पारितोषिक ‘आठवडय़ावर बोलू काही’ या भवन्स सोमाणी महाविद्यालयाच्या एकांकिकेने पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या अमोल भोर याला मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक भवन्स सोमाणी महाविद्यालयाच्या स्वप्निल बारस्कर याने पटकावले.
लेखकाच्या संहितेला आणि दिग्दर्शकाच्या मेहनतीला फळ देतात ते म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम पारितोषिक सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘सचिन..सचिन’ एकांकिकेतील अभिनेता ऋतुराज फोपे याला मिळाले. द्वितीय क्रमांक रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या ‘ननैतिक’ एकांकिकेतील शुभंकर तावडे 
याने पटकावला. तृतीय क्रमांकाचा विजेता पाटकर वर्दे महाविद्यालयाच्या ‘इन द परश्यूएट फॅमिली’ एकांकिकेतील शशांक जाधव ठरला आहे. (प्रतिनिधी)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -
च्प्रथम क्रमांक -सिद्धी कारखानीस (दस्तुरखुद्द) - साठय़े महाविद्यालय
च्द्वितीय क्रमांक - नियती घाटे (आठवडय़ावर बोलू काही) - भवन्स सोमाणी महाविद्यालय
च्तृतीय क्रमांक - मंजिरी दाते (बिइंग सेल्फिईश) - म.ल. डहाणूकर महाविद्यालय
 
विनोदी अभिनेता 
च्राजरत्न भोजने (ननैतिक) - रामनारायण रुईया महाविद्यालय
 
प्रकाशयोजनाकार 
भूषण देसाई (मोजलेम) - जोशी-बेडेकर महाविद्यालय
 
भित्तीचित्र (पोस्टर) 
च्बक्कल नं. 2क्4 - वि.ग. वङो महाविद्यालय
 
नेपथ्य व प्रकाशयोजनाकार 
च्विनोद राठोड (हे राम), प्रगती महाविद्यालय
 
पाश्र्वसंगीत -
च्पुष्कर कुलकर्णी (मोजलेम) - जोशी-बेडेकर महाविद्यालय

Web Title: Joshi-Bedekar again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.