कमालीच्या उष्म्याने जव्हारकरांची लाहीलाही
By Admin | Updated: March 21, 2016 01:08 IST2016-03-21T01:08:29+5:302016-03-21T01:08:29+5:30
होळी सणानंतर उष्मा सुरू होतो, मात्र यंदा मार्च महिना अजून उलाटायला वेळ असला तरी उष्म्याने जव्हारकरांना कधी न झालेली वणव्याची अनुभूती येत असून गेल्या

कमालीच्या उष्म्याने जव्हारकरांची लाहीलाही
जव्हार : होळी सणानंतर उष्मा सुरू होतो, मात्र यंदा मार्च महिना अजून उलाटायला वेळ असला तरी उष्म्याने जव्हारकरांना कधी न झालेली वणव्याची अनुभूती येत असून गेल्या तीन दिवसांत पारा ३६ अशांवर पोहोचला आहे. किमान तापमानातही दिवसगणिक वाढ होत असल्याने आता उन्हाचे चटके आणि झळा वाढल्याने शीतपेयांची मागणी वाढली असून पंखे, माठ, फ्रिज, कुलर यांची बाजारपेठ तेजीत आली आहे.
जव्हार शहरात नेहमी होळी नंतरच उन्हाच्या झळा सुरू होत असतात, परंतू यंदा ते रेकॉर्ड मोडून काढले गेले आहेत. मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेले जव्हार गेल्या काही वर्षांपासून बेसुमार जंगलतोड होत असल्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे मार्चमध्येच तापू लागले आहे. मागील काही दिवसांत अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मध्यंतरीच्या काळात नागरीकांची तारांबळ उडविली होती, त्यानंतर अचानक उन्हाच्या तडाख्याचा जोर इतका वाढला की, जमिनीतील वाफारा आणि वरून सूर्यप्रकाशाचा तडाखा अशा स्थितीत पारा वाढतच चालला आहे.