जव्हार पोटनिवडणुकीमध्ये शिवसेने पुढील पेच वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:43 IST2018-06-23T23:43:22+5:302018-06-23T23:43:29+5:30

शिवसेनेचे नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनामुळे रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ साठी पोटनिवडणुक जाहीर झाली

In the Jawhar by-election, Shivsena got the next scam | जव्हार पोटनिवडणुकीमध्ये शिवसेने पुढील पेच वाढला

जव्हार पोटनिवडणुकीमध्ये शिवसेने पुढील पेच वाढला

जव्हार: शिवसेनेचे नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनामुळे रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ साठी पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी १५ जुलै रोजी मतदान होणार असून १९ जून ते २५ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र शुक्रवारी चौथ्या दिवसापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही.
सध्या येथे शिवसेनेची सत्ता असली तरी राष्ट्रवादी आणि सेना अशी थेट लढत आजवर जव्हार नगरपरिषदेच्या राजकीय पलटवार दिसली आहे. यामुळे या ठीकाणी राष्ट्रवादीला उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार हा सवाल आहे. मात्र. सेनेकडून औसरकर यांचे लहान बंधू स्वप्नील औसरकर यांचे नाव चर्चेत असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सेनेकडून सर्व पक्षाना विनंती करणात आली आहे. यामुळे औसरकर यांच्या घरात उमेदवारी देत असल्याने बाकी पक्षही सहकार्याची भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, त्यांना अपक्ष उभे केल्यासच ही मदत मिळेल अन्यथा ही निवडणूक प्रतिष्ठेची होऊ शकेल अशीही माहीती विश्वसनीय सुत्रांकडून मिळली आहे.

Web Title: In the Jawhar by-election, Shivsena got the next scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.