शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचे जय सागर धरण कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:02 IST

आठवड्यात पाऊस पडला नाही तर शहर सोडून जाण्याची वेळ

जव्हार : या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जय सागर धरणात अतीअल्प म्हणजेच चार ते पाच दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या आठवड्यात पाऊस पडला नाही तर जव्हार शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होवून शहरातील नागरिकांना जव्हार शहर सोडून जावे लागेल, अशी स्थिती निर्माण होणार आहे.पाणी साठा चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. म्हणून २१, २५, ३० जूनलाच फक्त अर्धा तास पाणी सोडण्यात येईल, असे नगरपरिषदेने शहरात दवंडी देवून जाहीर केले आहे. तसेच नगरपरिषदेने नोटिस काढली आहे. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे जय सागर धरण हे ६० वर्षांपूर्वी संस्थानिक राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यावेळच्या दोन ते चार हजार लोकांसाठी बांधले होते. मात्र दिवसेंदिवस जव्हार शहराची लोकसंख्या १८ ते २० हजाराच्या आसपास वाढली आहे. त्यातच शहराला लागून रायतळे व कासटवाडी या दोन ग्रामपंचयात क्षेत्रातील अनेक कुटुंबांना याच धरणातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढल्याने धरणातील पाणी अपुरे पडू लागले आहे. धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. म्हणून पाणी साठा कमी होतो, याचा परिणाम आज पाऊस नसल्यामुळे जव्हारकराना भोगावा लागणार आहे. तसेच डॅममधील साचलेला गाळ काढण्यासाठी व डॅमची उंची वाढविण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढण्यात आला नाही की, उंचीही वाढविली नाही म्हणून ही वेळ आज जनतेवर ओढावली आहे. त्यामुळे आतातरी तातडीने धरणाची उंची वाढविणे व त्यातील गाळ काढणे ही कामे तातडीने होतील अशी अपेक्षा आहे.नगरपरिषदेने या जय सागर धरणाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. गाळ काढण्याचे टेंडर काढूनही ते व खोलीकरण केले नाही.- असरफ घाची (चॉईस मास्टर), तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई