जव्हारमध्ये पोटनिवडणूकीची तयारी आहे जय्यत सुरू
By Admin | Updated: May 20, 2017 04:57 IST2017-05-20T04:57:51+5:302017-05-20T04:57:51+5:30
जव्हार नगर परिषदेच्या ५ प्रभागांतील पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी आदिवासी भवन येथे कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे.

जव्हारमध्ये पोटनिवडणूकीची तयारी आहे जय्यत सुरू
- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार नगर परिषदेच्या ५ प्रभागांतील पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी आदिवासी भवन येथे कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे. तसेच मतदान केंद्रांची साफसफाई व लागणारी स्टेशनरी कापड इत्यादी वस्तूंचे बूथ प्रमाणे वाटप सुरू झालेले आहे. या प्रभागांसाठी २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडून येणाऱ्या पाच नगरसेवकांना अवघा सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तरीही निवडणूक लढविली जात आहे.
तसेच या निवडणूकी करीता १२ मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली असून प्रभाग क्र. १ मध्ये म्यु. पल समाजमंदीर गोरवाडी, बालसंस्कार केंद्र यशवंतनगर, पंचायत समिती तळमजला गटसाधन केंद्र, पंचायत समिती दुसरी ईमारत, तर प्रभाग क्र. ३ मध्ये म्यु. पल बालसंस्कार केंद्र महादेव आळी, राधा विद्यालय जुने खोली क्र. ३, ५ व ७ व प्रभाग क्र. ४ मध्ये नवीन पोलीस लाईन समाज मंदीर, जिमखाना हॉल, अंबिका चौक समाज मंदीर व मांगेलवाडा समाज मंदीर अशा १२ केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
या निवडणूकीकरीता पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, तसेच मतदारांनी आपला हक्क बजावा व जास्ती जास्त मतदानाला उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी पवनित कौर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांनी केले आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला होता. परंतु जव्हार प्रतिष्ठानने आपले उमेदवार उभे केल्याने पक्षांनी आपले उमेदवार अपक्ष उभे केले आहेत.