जव्हारला टोप्या, स्टोलची विक्री जोरात
By Admin | Updated: May 12, 2017 01:23 IST2017-05-12T01:23:56+5:302017-05-12T01:23:56+5:30
तालुक्यातील तापमानात कधी नव्हे अशी वाढ झालेली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने त्यापासून संरक्षण करण्यासाठी बाजारात

जव्हारला टोप्या, स्टोलची विक्री जोरात
हुसेन मेमन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील तापमानात कधी नव्हे अशी वाढ झालेली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने त्यापासून संरक्षण करण्यासाठी बाजारात विविध रंगी व आकर्षक टोप्या व स्टोल विक्रीसाठी आले आहेत. मुले-मुली व पालक त्याचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे.
सध्या बाजारपेठेत टोप्या व दुपटट्यांच्या विक्रीत अचानक वाढ झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या चित्रपट अभिनेत्यांच्या नावांच्या, टोप्यांच्या खरेदीसाठी युवकांची झुंबड उडते आहे. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरु झाला असून मे महिन्यातर उन्हाची तीव्रता प्रखर झाली असून अचानक पारा भडकल्याने टोप्या व दुपटट्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
यंदा जव्हारचे तापमान ४३ अंशाच्यावर गेल्यामुळे उन्हाचा तडाखा असहय झाला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्वच जण विविध उपाय शोधू लागले आहे. अनेकांना कामानिमित्त बाहेर पडणे आवश्यक असल्याने बागायतदार रुमाल व ओढणी यांच्याही मागणीत वाढ झालेली आहे.