सेंट झेवियर्स महाविद्यालयात रंगणार 'जनफेस्ट महोत्सव'
By Admin | Updated: January 22, 2015 04:22 IST2015-01-22T03:10:32+5:302015-01-22T04:22:39+5:30
इंडियन म्युझिक ग्रुपच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातर्फे 'जनफेस्ट महोत्सव' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंट झेवियर्स महाविद्यालयात रंगणार 'जनफेस्ट महोत्सव'
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - इंडियन म्युझिक ग्रुपच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातर्फे 'जनफेस्ट महोत्सव' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ जानेवारी रोजी होणारा हा महोत्सव म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असणा-यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात म्युझिक ग्रुपच्यावतीने अनेक वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दोन दिवस चालणा-या या महोत्सवाला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून २५ जानेवारी रोजी सुप्रसिध्द गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. कौशिकी चक्रवर्ती यांच्यासोबतच पहिल्या सत्रामध्ये संगीत संस्कृतीचा नवा चेहरा अशी ओळख असलेला व संतूर वादनाच्या संभावना भारतीय शास्त्रीय संगीताच्या पलिकडे जागतिक पातळीवर नेण्यांमध्ये मोठे योगदान देणारा संतूर वादक राहुल शर्मा आपली पेशकश सादर करेल. २६ जानेवारी रोजी होणा-या दुस-या सत्रामध्ये सांयकाळी डॉ. आश्विनी भिडे- देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताची मेजवानी उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. त्यानंतरच्या तिस-या सत्रात बासरीवादक रोणू मुजुमदार व शास्त्रीय गायिका बॉम्बे जयश्री यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर उस्ताद रशीद खान यांच्या संगीत मैफलीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.