शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"वसईत सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य" - डीसीपी संजयकुमार पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 15:53 IST

Vasai-Virar News : माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत 5 ठिकाणी शानदार लोकार्पण ; शहरांतील 145 कॅमेऱ्यांच 15 नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंची भर

वसई  -  वसईत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणे पोलिसांना शक्य होईलच मात्र शहरांतील कायदा व सुव्यवस्था ही यानिमित्ताने चोख राखली जाईल त्यासाठी अजूनही नागरिकांनी 'एक कॅमेरा शहरासाठी 'च्या उपक्रमात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचे आवाहन वसई विरार पोलीस आयुक्तांलयाचे परिमंडळ -2 चे डिसीपी संजयकुमार पाटील यांनी वसईत केले आहे.वसई विरार शहर महापालिका स्थापना होण्या आधीपासूनच स्मार्ट सिटी म्हणून नावाजलेले आणि त्यात "एक कॅमेरा शहरासाठी" या उपक्रमांतर्गत सन 2018 च्या सुरुवातीलाच वसई शहरात आधीच 804 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यात शहरात अजूनही काही ठिकाणी अधिक कॅमेरा बसविण्यात यावे त्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तांलय कार्यान्वित झाल्यावर पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या उपक्रमाला वसई विरारचे डीसीपी संजयकुमार पाटील यांनी सुरुवात करीत बुधवारी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 विविध ठिकाणी 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत वसई उपविभागाच्या डीवायएसपी अश्विनी पाटील,माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गोपनीय व गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.वसईत पंचवटी नाका,दोस्ती वसाहत, पं.दीनदयाळ नगर चौक, सनसिटी टेम्पो स्टॅण्ड आणि कौल हेरिटेज सिटी,स्टेला मुख्य प्रवेशद्वार अशा 5 प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून या उद्घाटनानंतर आता सीसीटीव्ही च्या माध्यमातून झोन -2 अंतर्गत येणाऱ्या पोलीस क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी थेट दिसणार आहेत. कुठेही गडबड ,चोरी, चेन स्नेचिंग आदी गुन्हे घडल्यास आरोपीची उकल व नेमकी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सीसीटीव्हीमुळे नक्कीच मदत होणार आहे, असेही डीसीपी पाटील म्हणाले.एकूणच झोन 2 मध्ये माणिकपूर पोलीस हद्दीत झालेल्या 5 ही ठिकाणच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्या ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती,समाजसेवक, पत्रकार, विकासक आदींनी पोलिस उपक्रमात सहभागी होऊन सीसीटीव्ही कॅमेरासाठी मदत केली अशा सेवाभावी संस्था व व्यक्तीना परिमंडळ 2 चे डीसीपी संजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक ही देण्यात आले,यावेळी वसईतील सर्व पोलीस अधिकारी, महिला पुरुष आदी संघटना व त्यांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व अन्य लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित अंतर व मास्क लावून उपस्थित होते.वसईत या अगोदरच 800 हुन अधिक कॅमेरे !'एक कॅमेरा शहरासाठी' ही मोहीम 2018 मध्ये च राबविण्यात आली होती, आणि या मोहिमेला देखील त्यावेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता ,आकडेवारी पाहिली तर शहरात एकूण 804 सीसीटीव्ही कॅमेरे हे शहरासाठी लावण्यात आले आहेत.यामध्ये 716 कॅमेरे हे रस्त्याच्या दिशेने वळविण्यात आले आहेत, तर 88 कॅमेरे हे नव्याने लावण्यात आले आहेत.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सन 2018 ची आकडेवारी(यात बदल ही असू शकेल)वसई - 131माणिकपूर- 142वालीव - 134नालासोपारा- 62तुळींज - 135विरार- 113अर्नाळा- 87एकूण - 804एक कॅमेरा शहरासाठी या मोहिमेंतर्गत शहरातील रस्त्यावरील हॉटेल,दुकानदार, सोसायटय़ा, मॉल, बँका, वसाहती, कार्यालये, शैक्षणिक संस्था आदींनी सहभागी होण्यासाठी पुढाकार आवश्यक आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस