आगाऊ फी वसुलीच्या तक्रारीमुळे दिला दाखला

By Admin | Updated: May 9, 2017 00:17 IST2017-05-09T00:17:32+5:302017-05-09T00:17:32+5:30

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाने सहावीतील संविधान रवींद्र चंदणे याचा निकाल देताना सातवीचे प्रवेश शुल्क आगाऊ मागितले.

Issuance of advance fee due to complaints | आगाऊ फी वसुलीच्या तक्रारीमुळे दिला दाखला

आगाऊ फी वसुलीच्या तक्रारीमुळे दिला दाखला

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाने सहावीतील संविधान रवींद्र चंदणे याचा निकाल देताना सातवीचे प्रवेश शुल्क आगाऊ मागितले. याबाबत, त्याच्या
पालकांनी मुख्याध्यापक घोडके यांना विचारणा केली असता शाळेने थेट संविधान याचा शाळा सोडल्याचा दाखलाच त्याच्या पालकांच्या हातात ठेवला.
संविधान याने गेल्या शैक्षणिक वर्षाची फी १०८० एवढी भरली. त्यानंतर, पुन्हा त्याच्या पालकांकडून १२०० रु. घेतले. यानंतरही तो सहावीचा निकाल आणण्यासाठी शाळेत गेला असता, फी न भरल्याने तुझा निकाल मिळणार नाही, असे शिक्षकांनी सांगितले. ही बाब संविधान याने घरी जाऊन सांगताच त्याच्या वडिलांनी शाळेत चौकशी केली.
शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रकाश घोडके यांनीही त्यांना आगाऊ फी भरण्यास सांगितले. यावर, माझ्या मुलाने अद्याप सातवीत प्रवेशही घेतला नसताना, आगाऊ फी कशी घेता, अशी विचारणा करत मुलाचा दाखला मागितला. मुख्याध्यापकांनीही नियम धाब्यावर बसवत दाखला दिला. अद्याप कोणत्याच शाळेत प्रवेश न मिळाल्याने वर्ष वाया जाण्याची भीती त्याच्या पालकांना सतावत आहे.

Web Title: Issuance of advance fee due to complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.