शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

अर्नाळा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन, पालघरमधील पहिले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:35 IST

पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले.

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले.कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन, कामाची गती या विविध १४ निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याआधी वसई अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला आयएसओ नामांकन मिळालेले होते. त्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन मिळाले आहे. गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या हस्ते अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाºया कंपन्यांना आयएसओ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन दिले जात होते. सेवा देणाºया संस्थांनाही आता ते देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्व संस्थांना चांगले काम करून आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्याचे आवाहन केले होते. गंभीर गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणे ४० टक्क्यांपेक्षा कमी आहेत, नागरिकांशी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे आहे, नागरिकांना योग्य वागणूक मिळते का, कार्यालयातील वाहनांची स्थिती कशी आहे, प्रसाधनगृह आहे का, नागरिकांनी केलेल्या ईमेल्सला कसा प्रतिसाद दिला जातो, कामकाजाच्या वेळी नियमांचे पालन होते का, सीसीटीव्ही कॅमेरे योग्य लावण्यात आलेले आहेत का आदी बाबी तपासण्यात आल्या.हे प्रमाणपत्र तीन वर्षे राहणार आहे. त्या कालावधीत संस्थेचे सदस्य निकषांची पूर्तता होते अथवा नाही, त्याची नियमित पाहणी करणार आहेत. वसई अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या कार्यालयाला आयएसओ 9001: 2015 हे प्रमाणपत्र नोव्हेंबर २०१८ मध्ये मिळाले होते. यासाठी लागणारे सर्व १४ निकष अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यलयाने पूर्ण केले होते. त्यानंतरच त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर विजयकांत सागर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आवाहन केले होते.हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हे प्रमाणपत्र गुरु वारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला मिळाले असून बाकी पोलीस ठाण्यांना देखील याबाबत प्रोत्साहन देणार आहे असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले आहे. नागरिकांना अधिकाअधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर