शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कमिटीकडून ‘नवोदय’ची चौकशी; ११वीच्या विद्यार्थ्यांची ३५ जणांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:03 IST

यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या केंद्रीय कमिटीच्या माधुरी उदय शंकर यांनी शाळेला भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे.

पालघर : वडराई येथील जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावी इयत्तेतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या केंद्रीय कमिटीच्या माधुरी उदय शंकर यांनी शाळेला भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे.

केंद्र शासन अनुदानित असलेले वडराई येथील नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमधील ११वी इयत्तेतील ७ विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेतील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना बोलावीत त्यांचे रॅगिंग केल्याचा प्रकार ३० सप्टेंबर रोजी घडला होता.  या  मारहाणीत अनेक मुले जखमी झाली. कोणाच्या कानाचे पडदे फाटणे, नाकातून रक्त येणे, काहींच्या गुप्तांगावर लाथा मारण्यात आल्या आहेत. या गंभीर घटनेची माहिती समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापन, प्रिन्सिपॉल यांनी हे प्रकरण हलकेपणात घेत विद्यार्थ्यांना चूप राहण्याची समज दिल्याचे पालकांनी सांगितले.

शाळेबाबत आढळल्या त्रुटी शाळेसंदर्भात काही त्रुटी असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी मान्य करीत त्यावर उपाययोजना करून शाळेची गुणवत्ता सुधारण्याबाबत नक्कीच उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा निर्णय हा प्राचार्यांनी घ्यायचा असल्याने या विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा प्रकार केला होता का? याची चौकशी होणार असून, ११ वी इयत्तेतील दोन-तीन विद्यार्थ्यांवर याप्रकरणी कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांचा वर्तणूक अहवाल सादर केला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबाबत तक्रारी असल्याने याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

 या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुण्याहून नवोदय विद्यालय समितीच्या विभागीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त माधुरी शंकर यांनी सोमवारी नवोदय विद्यालय पालघर येथे भेट दिली. सकाळपासूनच त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय