सुरुच्या बागेजवळ बेकायदा भराव

By Admin | Updated: March 25, 2016 00:33 IST2016-03-25T00:33:21+5:302016-03-25T00:33:21+5:30

वसई गावातील सुरुच्या बागेजवळील पाणथळ जागेत बेकायदेशिरपणे मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. याप्रकरणी

Invalid flooding in the beginning of the Bagh Civil | सुरुच्या बागेजवळ बेकायदा भराव

सुरुच्या बागेजवळ बेकायदा भराव

वसई : वसई गावातील सुरुच्या बागेजवळील पाणथळ जागेत बेकायदेशिरपणे मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातून चौकशी करून तहसिलदारांना बेकायदा माती भराव प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. तर जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयाला कळवण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात महसूल कार्यालयाची संशयास्पद भूमिका असल्याचे समोर येऊ लागले आहे.
वसईचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. याठिकाणी असलेल्या सुंदर अशा सुरुच्या बागेशेजारी २५ एकर पाणथळ जमिन खाजगी मालकीची आहे. त्यात तिवरांची झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. ही जागा पाणथळ असल्याने संरक्षित आहे. याठिकाणी मोठया प्रमाणावर मातीचा बेकायदेशीर भराव करून रस्ता तयार करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंंदा गुंजाळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर नायब तहसीलदार अर्चना खंडागळे यांनी जागेवर जाऊन तपासणी केली. आता सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या लोकांना नोटीसा बजावून चौकशी करण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी जमिनीत येऊ नये यासाठी बेकायदा माती भराव करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

भराव झाल्याचे दिसून आले असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे तहसील कार्यालयाला कळवण्यात आले आहे. तसेच भूमिअभिलेख कार्यालयाला जागेचे सर्वेक्षण करण्याचे कळवण्यात आलेले आहे. तिवरांची झाडे तोडल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले नाही.
- अर्चना खंडागळे, नायब तहसिलदार

महसूल खात्याची भूमिका संशयास्पद आहे. बेकायदा माती भराव केल्याचे दिसत असून अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. महसूल खात्याकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवून पुरावे नष्ट करण्यास वाव दिला जात आहे. - गोविंदा गुंजाळकर, तक्रारदार

जमीन मोजणीचे प्रांताधिकारी कार्यालयातून फक्त पत्र आलेले आहे. ती करण्यासाठी जागेचे मालक कोण, सातबारा उतारा, संबंधित कागदपत्रे, जर जागा सरकारी असेल तर तसे आदेश लागतील. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय मोजणी करता येत नाही.
- योगेश्वर सावकार, भूमिअभिलेख

Web Title: Invalid flooding in the beginning of the Bagh Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.