अपहरणाचा बेत फसला

By Admin | Updated: July 6, 2017 05:49 IST2017-07-06T05:49:39+5:302017-07-06T05:49:39+5:30

नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते.

The intention of the abduction was unsuccessful | अपहरणाचा बेत फसला

अपहरणाचा बेत फसला

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी केल्याने अपहरणकर्त्यांनी रिक्शाचालकाला सोपारा येथील चक्रेश्वर तलावाजवळ सोडून पळ काढला.
श्रीप्रस्थ येथे राहणारे सहदेव विनायक राजापूरकर (३५) यांचे रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सहदेव आपला मित्र सत्यवान यांच्यासोबत फनफिएस्टा थिएटर परिसरात जात असताना अचानक एका कारने (क्रमांक एमएच ४८ एफ ३०८८) रिक्शा अडवली. कारमधून उतरलेल्या चार इसमांनी सहदेव यांना जबरदस्तीने कारमध्ये घालून पसार झाले. हा प्रकार सत्यवान यांनी सहदेव यांच्या पत्नीला सांगितला. पत्नीने लगेचच नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तपासाची चक्र फिरले.
अपहरणकर्ते सहदेव यांना समुद्रकिनारी नेऊन यांच्याकडून एका इसमाची माहिती विचारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहरणकर्ते ज्या कारमधून आले होते त्याचा क्रमांक मिळाल्याने आरोपींचा शोध घेणे सोपे झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Web Title: The intention of the abduction was unsuccessful