‘वनविभागच्या कामांची चौकशी करा’
By Admin | Updated: March 29, 2016 03:03 IST2016-03-29T03:03:17+5:302016-03-29T03:03:17+5:30
मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आसे परिमंडळ मधील नियतक्षेत्र धामोडी व बेरीस्ते या वन विभागाच्या नियतक्षेत्रा मध्ये सन २०१५-१६ साली झालेली वन विभागातील विकास

‘वनविभागच्या कामांची चौकशी करा’
मोखाडा : मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आसे परिमंडळ मधील नियतक्षेत्र धामोडी व बेरीस्ते या वन विभागाच्या नियतक्षेत्रा मध्ये सन २०१५-१६ साली झालेली वन विभागातील विकास कामे निकृष्ट असल्यांनचा आरोप आर. पी. आय. कार्यकर्ते राजु गोविंद साळवे केला आहे. यासंदर्भातील तक्रार विभागीय अधिकारी जव्हार याच्याकडे तक्रार केली आहे.
वर्ष २०१५-१६ या पावसाळा काळात धामोडी या नियतक्षेत्रा मध्ये दर्जा कमी झालेल्या वनांचे पुर्नवनिकरण करणे या योजने अंतर्गत कं.नं. १००, कुप नं. ६ या २५ हेक्टर लागवड क्षेञामध्ये जवळपास २७,५०० हजार मिश्र रोपांची लागवड करण्यांत आलेली आहे. माञ या रोपांची लागवड व्यवस्थीत न केल्याने निम्या पेक्षा अधिक मिश्र रोपे नष्ट झालेली आहेत तर उर्वरित रोपांची लागवड न करता दुर्लक्ष करून कामचुकारपणा झाल्यांने तशीच वाळुन पडली आहेत. यामुळे जंगलातील वनांचे प्रमाण वाढवून सृष्टी चा समतोल व वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे या महाराष्ट्र वन विभागांच्या नियमावली बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम मोखाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. तर दुसरीकडे बेरीस्ते वनपरिक्षेत्रा मधील वांगणपाडा या गावातील परिक्षेत्रामध्ये ल्युजबोल्ड या योजनेअंतर्गत जमिनीची धुप होऊ नये यासाठी डोंगर- कपारिच्या उतारा जवळ बांधलेले दंगडबांध बांधकाम पुर्ण होऊन अवघ्या ४ ते ५ महिन्यातच फुटलेल्याने या बांधकामाच्या दर्जा विषयी प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.
जंगलातील जनावरांची ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम पुर्ण करण्यांत आले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात बंधाऱ्यांतील पाण्याला गळती लागली असून बंधाऱ्यांत भरगच्च गाळ साचलेला आहे. (वार्ताहर)
मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत ज्या कामांच्या दर्जा संदर्भात आरोप होत आहेत ती सर्व कामे चांगल्या दजार्ची केली आहेत. झाडांची लागवड ही मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. परतु या बाबत चुकीची तक्रारी केल्या जात आहेत.
- टि. बी आहिरे, वन क्षेत्रपाल