जखमी तरुणाला पोलिसांनी हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:37 IST2020-06-12T23:36:41+5:302020-06-12T23:37:24+5:30

खूप दारू पिऊन आला होता. काहीच सांगत नव्हता. मेडिकल केले होते, गाडी स्वत: चालवून पळून गेल्याची पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद आहे. परत आल्यावर त्याची तक्रार घेतली जाईल.

The injured youth was chased away by the police | जखमी तरुणाला पोलिसांनी हुसकावले

जखमी तरुणाला पोलिसांनी हुसकावले

नालासोपारा : जखमी अवस्थेत मदत मागणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हुसकावून लावल्याची घटना उघड झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक तरुण जखमी अवस्थेत तुळिंज पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेला होता. त्याची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी दमदाटी करून त्याला हाकलून लावले. माझी तक्रार घ्या आणि मला हॉस्पिटलमध्ये दाखल करा, अशी वारंवार विनवणी करूनही पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर तरुणाने आपल्या जखमी अवस्थेतील सेल्फी काढून तो सोशल मीडियावर वायरल केला आणि आपबिती व्यक्त केली. या घटनेमुळे पोलिसांची नाचक्की झाली असून सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

खूप दारू पिऊन आला होता. काहीच सांगत नव्हता. मेडिकल केले होते, गाडी स्वत: चालवून पळून गेल्याची पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद आहे. परत आल्यावर त्याची तक्रार घेतली जाईल.
- डी. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज

Web Title: The injured youth was chased away by the police