भरधाव गाडीच्या धडकेने तरुणी जखमी
By Admin | Updated: May 14, 2017 22:43 IST2017-05-14T22:43:48+5:302017-05-14T22:43:48+5:30
येथील उपलाट गावा नजीकच्या आमगाव फाट्यावर शनिवारी सकाळी एका भरधाव ओमिनी कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या सुवर्णा डावरे (२५) या तरुणीला धडक देऊन जखमी केले आहे.

भरधाव गाडीच्या धडकेने तरुणी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : येथील उपलाट गावा नजीकच्या आमगाव फाट्यावर शनिवारी सकाळी एका भरधाव ओमिनी कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या सुवर्णा डावरे (२५) या तरुणीला धडक देऊन जखमी केले आहे.
उपलाट गावातील ही तरु णी कामासाठी आपल्या दुचाकीवरून आमगाव फाटा येथे कामाला येत असताना मागून भरधाव येणाऱ्या डीएन ०९ ओमीनी गाडीने तिला जोरदार धडक देऊन उडविले यात सुवर्णा जखमी झाली. धडक दिल्यानंतरही ओम्नी कार न थांबता तशीच पुढे निघून गेली. या गाडीचा पूर्ण नंबर गावकऱ्यांना घेता आला नसला तरी या गाडीत दारू भरली असल्याचा संशय गावकऱ्यान्ांी व्यक्त केला आहे.