माहिती अधिकार कार्यकर्त्याला जबर मारहाण
By Admin | Updated: May 5, 2017 04:12 IST2017-05-05T04:12:31+5:302017-05-05T04:12:31+5:30
सईतील महापालिका व शासकीय अनागोंदी कारभार माहिती अधिकारातून उघड करणाऱ्या नीलेश वर्तक या माहिती

माहिती अधिकार कार्यकर्त्याला जबर मारहाण
विरार : वसईतील महापालिका व शासकीय अनागोंदी कारभार माहिती अधिकारातून उघड करणाऱ्या नीलेश वर्तक या माहिती अधिकार कार्यकर्त्याला जमावाने प्रभाग समिती ‘आय’च्या कार्यालयाबाहेरच जबर मारहाण केल्याची घटना घडली.
मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास प्रभाग समितीच्या कार्यालयात सुमारे दहा ते बारा जणांच्या जमावाने जबर मारहाण केल्याची तक्रार वर्तक यांनी वसई पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणीत वर्तक यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या.