महागाई : वसईत काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: October 27, 2015 00:02 IST2015-10-27T00:02:17+5:302015-10-27T00:02:17+5:30
वसई-विरार जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले

महागाई : वसईत काँग्रेसची निदर्शने
वसई : वसई-विरार जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीतर्फे महागाईविरोधात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. गेल्या वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंची झालेली भरमसाट दरवाढ, धार्मिक तेढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच आर्थिक गैरप्रकार यांच्या निषेधार्थ ही सर्व आंदोलने होत आहेत.
वसई तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणाचा कडाडून निषेध केला. आंदोलकांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये तुरीच्या डाळीची दरवाढ कमी करणे व स्वस्त धान्य दुकानांमध्ये माफक दरामध्ये धान्य उपलब्ध करून देणे इ. मागण्यांचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)