शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

वीज बील भरणा केंद्रे वाढवा; डहाणूतील किनाऱ्यालगतच्या ग्राहकांची मोठी गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:04 AM

डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.

बोर्डी : डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.वीज देयकात छापील मुदतीत वीज देयके भरणा न कळल्यास ग्राहकांना अधिभार सोसावा लागतो. शिवाय महावितरणचे कर्मचारी गृहभेटी देऊन देयकं भरा अन्यथा पुरवठा खंडीत करण्या बाबत सूचित करतात. मात्र, किनारपट्टीतील डहाणूगाव, नरपड, आगर, मल्याण अशा भागात वीज भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांना मसोली येथील महवितरणच्या कार्यालयात जावे लागते. तेथे ग्राहकांची लांबच लांब रंगा असल्याने अनेक तास वाया जातात. काही वेळा एक दोन वेळा हेलपाटे मारल्यावर नंबर लागतो. त्यामुळे शारीरिक व आर्थिक दोन्हीचे नुकसान सोसावे लागते असे ग्राहकांचे म्हणणे आहे.या पुर्वी सुद्धा देयके सेतू कार्यालयात स्विकारली जायची, आता डहाणू जनता सहकारी बँकेच्या पूर्व शाखेत घेतली जातात. परंतु हे अंतर लांब असून दोन वेळा रिक्षा बदलावी लागत असल्याने ग्राहकांकरिता भुर्दंड पडत आहे.- किनारपट्टी भागात वीज बील भरणा केंद्र सुरु करण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी उप अभियंते धोडी यांची भेट घेऊन केली होती. मात्र, त्या बाबत अद्याप ठोस पाऊल उचलण्यात न आल्याची खंत व्यक्त होत आहे. दरम्यान महावितरणने ग्राहकांच्या हिताचा विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार