शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढणार; रुग्णांची पायपीट वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:11 IST

अतिरिक्त २० खाटांसाठी होणार काम, ब्लडबँकेचीही होणार उभारणी

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्याने इथल्या रुग्णांना नाइलाजाने उपचारासाठी गुजरात व इतरत्र जावे लागत होते. हे सत्र थांबविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनासोबत प्रयत्नशील असून पालघरचे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त २० खाटा जोडून रुग्ण सामावण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. सोबतच ब्लडबँकची उभारणी होणार असल्याने गंभीर रुग्णांना लागणारे रक्त आता बाहेरून आणण्याची आवश्यकता भासणार नाही.पालघर जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३०६ उपकेंद्र अशा कागदोपत्री भक्कम दिसणारी आरोग्य यंत्रणा व त्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाहता इथला एकही रुग्ण योग्य उपचाराविना मृत्युमुखी पडूच शकणार नाही, असा विश्वास साहजिकच सर्वांना वाटू शकतो. मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळेच असून रात्रीचे डॉक्टरच नसणे, अद्ययावत यंत्रे, आवश्यक औषध साठा, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, रिक्त जागा आदी अनेक समस्यांच्या विळख्यात ही यंत्रणा सापडली आहे. त्याचबरोबर अनेक रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीने गांजलेले हजारो कुटुंबीय आपल्या रुग्णांना घेऊन इथल्या रुग्णालयात जाण्याऐवजी सरळ गुजरात आणि सिल्वासामधील रुग्णालय गाठून आपल्या रुग्णांवर उपचार करण्यात धन्यता मानत आहेत. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात एक तरी अत्याधुनिक उपकरणे व तज्ज्ञ डॉक्टर असलेले रुग्णालय असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.पालघरमध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी झाल्यानंतर या रुग्णालयातील रिक्त जागांची समस्या आजही सुटलेली नाही. आज रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्ण विभागाची संख्या ४५० वर गेली असून ३० खाटांची मर्यादित क्षमता असल्याने एका खाटेवर दोन-दोन रुग्ण झोपवून उपचार केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व जे. जे. युनिटच्या इमारतीचे एकत्रीकरण करून आंतर रुग्णांच्या खाटांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.ग्रामीण रुग्णालयाला ८० हजाराचा निधी मंजूर झाला असून २ वार्ड बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याच कामाशेजारील उर्वरित जागेत शिल्लक राहणारा निधी व त्यामध्ये पालघरमधील एका दानशूर व्यक्तीने विनामूल्य इमारत बांधणीची इच्छा आरोग्य विभागाकडे व्यक्त केली आहे. अशा वेळी ग्रामीण रुग्णालयातील ३० खाटांची क्षमता वाढवून त्यात अन्य २० खाटांची भर पडल्यास अधिक आंतररुग्ण (आयपीडी) सामावून घेतले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत लागणाºया स्टाफची पूर्तताही केली जाऊ शकते किंवा जिल्ह्यातील ९ ग्रामीण रुग्णालये व ३ उपजिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त असणारा स्टाफ इथे वळवून आरोग्य यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. तसेच वाडा व बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले दोन सर्जन आठवडाभरासाठी पालघराच्या या ग्रामीण रु ग्णालयात आणता येतील. ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीदरम्यान सिझर करण्यासाठी महिलांना बाहेरच्या रु ग्णालयात पाठवून त्यांची होणारी आर्थिक लूट त्यामुळे रोखता येणार आहे. ग्रामीण रु ग्णालयात असणाºया ६ परिचारिका आणि जे. जे. युनिटमध्ये असणाºया ७ परिचारिकांना यांना नवीन यंत्रणेशी जोडून त्यांच्या माध्यमातून रुग्णांनाचा वाढता भारही रोखला जाणार आहे. मात्र विषप्राशन केलेल्या गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि आयसीयू केअर सेंटरसारख्या यंत्रणांची असलेली कमतरता भरून काढल्यास इथल्या रु ग्णांची गुजरात व सिल्वासा भागातील रुग्णालयाकडे वळणारी पावले रोखली जाणार आहेत. त्यासाठी अजून काही दानशूर व्यक्तींनी पालघर ग्रामीण रुग्णालयात उभारल्या जाणाºया अतिरिक्त सेवेमध्ये आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे.आरोग्य सेवेचे जाळे बळकट होणारपालघर ग्रामीण रु ग्णालयात अद्ययावत ब्लड बँकेच्या उभारणीसाठी ५ कोटीचा निधी मंजूर झाला असून त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १ कोटी खर्चाची इमारत व ४ कोटींची अद्ययावत यंत्रणा उभी करून रक्त साठवणूक केले जाणार आहे. त्यामुळे अपघातातील गंभीर रु ग्णांना विनामूल्य रक्ताचा पुरवठा होणार असून रक्तासाठी खाजगी ब्लड बँकांचे उंबरठे झिजवणे बंद होणार आहेत. तसेच एचआयव्ही, हेपटायटीस आदी आजाराच्या चाचण्याही विनामूल्य होणार आहे. ही कोलमडलेली आरोग्य यंत्रणा पूर्ववत रु ळावर आणण्याच्या दृष्टीने कोळगाव येथे सिडकोकडून उभारण्यात येत असलेल्या जिल्हा प्रशासकीय इमारतीमध्ये एक जिल्हारुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक २५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती. अनेक प्रयत्नानंतर ही जमीन मिळण्यास सिडकोकडून हिरवा कंदील मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले. जिल्हा रुग्णालय सुरू होण्यास कमीत कमी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर त्यात अद्ययावत यंत्र सामग्री, प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग सेवा व तज्ज्ञ डॉक्टर सेवा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाºया प्रशिक्षित डॉक्टरांची मदतही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला होणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्यसेवेचे जाळे बळकट होण्यास मदत होणार आहे.ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त सेवा निर्माण करण्यास काही दानशूर व्यक्ती पुढे येत असल्याने आरोग्य विभागाच्या परवानगीने सर्व प्रक्रि या पूर्ण करून अतिरिक्त आरोग्य यंत्रणा उभी राहिल्यास त्याचा मोठा फायदा गरीब रु ग्णांना होऊ शकतो. - डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, पालघर