मोह प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: May 5, 2017 05:30 IST2017-05-05T05:30:58+5:302017-05-05T05:30:58+5:30
विक्र मगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र मोह (खुर्द) मलवाडा विक्र मगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे

मोह प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
विक्रमगड : विक्र मगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र मोह (खुर्द) मलवाडा विक्र मगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आरोग्य ही महत्वाची सेवा आहे. दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरोग्य सेवेसाठी येथे निवासी डॉक्टर असणार आहेत. तसेच नवी इमारत सर्व सोयींनी युक्त आहे.
या केंद्रात चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करु न द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यानी आरोग्य यंत्रणेला दिल्यात या आरोग्य केंद्रात प्रसूती सेवा, लसीकरण सत्र, विविध आजारांवर उपचार अशा विविध आरोग्य सेवा मिळणार आहेत.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले तसेच पंचायत समिती विक्र मगड सभापती जिजाबाई टोपले, उपसभापती मधुकर खुताडे, महिला व बाल कल्याण सभापती विनिता कोरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिंलिंद चव्हाण, जिल्हा कार्यक्र म अधिकारी डॉ. अभिजीत देबडवार आदि मान्यवरांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणीप्रश्न कायमचा सोडविणार!
जिल्ह्यातील दुर्गम भागात भेडसावणारे पाणी व इतर प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद कमी पडू देणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्यात जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.