पालघर जिल्ह्यात अपुरा धान्यपुरवठा
By Admin | Updated: September 26, 2015 00:40 IST2015-09-26T00:40:47+5:302015-09-26T00:40:47+5:30
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१०

पालघर जिल्ह्यात अपुरा धान्यपुरवठा
पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ तर २८ हजार ४७० क्विंटल गव्हाचे नियतन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिले होते. परंतु सप्टेंबर
महिना संपत आला तरी अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात साखरेचे वाटप लाभार्थ्यांना झाले असून अनेक भागात अपुरा पुरवठा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा हे सहा तालुके आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जात असून पालघर व वसई हे तालुके अंशत: आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत असलेल्या प्राधान्य कुटूंबा (पिवळे रेशनकार्डधारक कुटूंब व अंत्योदय कार्डधारक) च्या १४ लाख २३ हजार ५९५ लाभार्थ्यांना हे धान्य वितरीत करण्यात येणार होते. त्यासाठी प्राधान्य कुटुंबातील प्रतिकार्डधारकाला २५ किलो तांदुळ याप्रमाणे ४२ हजार ४५० क्विंटल तांदुळ तर १० किलो गहु या प्रमाणे ९८७० क्विंटल गहु व ०.६६० ग्रॅम साखर प्रती माणशी वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील प्रती माणशी ५०० ग्रॅम साखर वाटप करण्यात येत असले तरी सप्टेंबर महिन्यात आलेल्या सणासाठी प्रती मानशी ६६० ग्रॅम साखरेचे वाटप करण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन त्यासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर आठ तालुक्यातील वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
जव्हार तालुक्यातील १ लाख १६ हजार ८० लाभार्थ्यांसाठी ५१७
क्विंटल साखर, विक्रमगड तालुक्यात १ लाख २६ हजार ६६९ लाभार्थ्यांसाठी ५६४ क्विंटल, मोखाडा तालुक्यातील ८२ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी
३६६ क्विंटल, पालघर तालुक्यातील १ लाख ९७ हजार ७६१ लाभार्थ्यांसाठी ८८० क्विंटल साखर,
डहाणू तालुक्यातील २ लाख ४२
हजार ६६६ लाभार्थ्यांसाठी १०८१ क्विंटल, तलासरी तालुक्यातील १ लाख २० हजार ४०८ लाभार्थ्यांसाठी ५३६ क्विंटल साखर, वाडा तालुक्यातील १ लाख २१ हजार ९६९ लाभार्थ्यांसाठी ५४३ क्विंटल तर
वसई तालुक्यातील ८७ हजार १६४ लाभार्थ्यांसाठी ३८८ क्विंटल साखरेचे वाटप करण्याची मंजुरी देण्यात आलेली होती.
आॅगस्ट २०१५ मध्ये तालुक्यातील गोदामामध्ये शिल्लक
असलेली ३३९०.३६ क्विंटल
साखरही सप्टेंबर महिन्यात वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
बांगर यांनी दिले होते.
परंतु आजही अनेक तालुक्यात साखरेचे वाटप करण्यात आले नसून अनेक भागात अपुरे वाटप झाले आहे. (वार्ताहर)