शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वेलंकनी परिसरात अनैतिक व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:22 IST

अनैतिक व्यवसायांमुळे तीर्थमंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन गावातील मुलामुलींवर या सर्वांचे वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मीरा रोड : उत्तन येथील प्रसिद्ध वेलंकनी तीर्थमंदिर परिसरात फोफावलेल्या बेकायदा हॉटेलांमधून वेश्या व्यवसाय, हुक्का, मद्यपान, डीजेचा धिंगाणा व अश्लील प्रकारांमुळे ग्रामस्थ संतापले असून याविरोधात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्याची तयारी सुरू केली आहे. या अनैतिक व्यवसायांमुळे तीर्थमंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन गावातील मुलामुलींवर या सर्वांचे वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.उत्तनगाव हे मच्छीमारांचे. भाटेबंदर येथील समुद्राजवळ निसर्गरम्य ठिकाणी असलेले ख्रिस्तीबांधवांचे वेलंकनी तीर्थमंदिर हे अत्यंत पवित्र व श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. केवळ ख्रिस्तीच नव्हे तर हिंदू, मुस्लिमही आवर्जून येतात. पूर्वी भाटेबंदर हे समुद्रकिनारा असूनही दुर्लक्षित होते. परंतु, वेलंकनीमातेचे तीर्थमंदिर म्हणून जगभर ख्याती झाली आणि आज मोठ्या संख्येने नागरिक येऊ लागले. वेलंकनीमातेचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो.बीचवर येणाऱ्या जोडप्यांचे चालणारे अश्लील चाळे, खुलेआम चाललेले मद्यपान, समुद्रात बुडण्याच्या वाढत्या घटना नेहमीच्याच. पण, मागील काही काळापासून या ठिकाणी सरकारी व खाजगी जागेत झालेल्या बेकायदा हॉटेलांमध्ये बेकायदा मद्यविक्री, हुक्का यासह डीजेच्या तालावर धिंगाणा चालत आहे. रात्री उशिरापर्यंत डीजे चालतो.पोलीस हॉटेलांमध्ये कधीतरी कारवाई करून खानापूर्ती करतात, तर बहुतांश स्थानिक नेते तसेच ग्रामस्थही याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. तीर्थमंदिराजवळील मॅजिक किचन या एका बेकायदा हॉटेलमधून मद्यपुरवठ्यासह वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार नुकताच सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उघड केला. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन मुलींची सुटका केली आहे, तर हॉटेलच्या चौघांना अटक करून साडेबावीस हजारांची दारू जप्त केली.गिल्बर्ट गौरया व भाटेबंदर युवा संघटनेचे कॅझिटन गोजी व सदस्यांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनीही संघटना ग्रामस्थांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.बेकायदा बांधकामांवर कारवाई का नाही?पोलिसांनी सातत्याने येथील अनैतिक व गैरकृत्यांवर कारवाई करावी. हॉटेलांची बांधकामे बेकायदा असून सरकारी जमिनी व सीआरझेडमध्ये आहेत. लाखो रुपयांची भाडी घेतली जात आहेत. ग्रामस्थांना स्वत:चे घर बांधायचे तर अडचणी येतात. मग, यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे रेनॉल्ड बेचरी म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हाmira roadमीरा रोड