ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा- राजेंद्र गावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:30 IST2019-11-17T22:30:08+5:302019-11-17T22:30:15+5:30
वसई प्रांतांच्या दालनात विशेष बैठक

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा- राजेंद्र गावित
वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूककोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर खा. राजेंद्र गावित यांनी वसई प्रांताधिकाºयांच्या दालनात नुकतीच एक विशेष बैठक घेतली.
या बैठकीत वसईतील वाहतूककोंडीसाठी वाहतूक पोलीस बळ वाढवणे, वसई ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे, भातशेती, मीठशेती, मत्स्यशेती, फुलशेती, वनपट्टे आणि खाजगी वने यांचे पंचनामे करणे, शेतकºयांस विमा योजनेत सहभागी करणे, वसई तालुका कृषी संमेलन घेणे, अतिक्र मण पथकाची कारवाई वेळ वाढवणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यायही उपलब्ध करून दिले. लवकरच या सूचनांची अंमलबजावणी होईल, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. रेल्वे संदर्भातील तक्रारींसाठी मी लवकरच रेल्वे अधिकाºयांच्या बैठका घेईन, असेही गावित म्हणाले.
या बैठकीस वसईचे प्रांताधिकारी स्वप्नील तायडे, वसई - विरार मनपाचे अति. आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, वसई परिवहन पोलीस अधिकारी (वसई विरार), नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, वसई तालुका कृषी अधिकारी शिरसाठ, शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालघर जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, वसई वि.स.समन्वयक हरिश्चंद्र पाटील, वसई शहरप्रमुख राजाराम बाबर आदी उपस्थित होते.