Ignoring the report of the inspection, the Vasai-Virar flooded | निरीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई-विरारमध्ये महापूर
निरीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई-विरारमध्ये महापूर

वसई : वर्षातून फक्त एकदा अथवा दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण होणाºया पालघर जिल्ह्यात तथा वसई तालुक्यात यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात तब्बल चार वेळा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि वसईचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे.

पाऊस त्याचे काम करतोय मात्र महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका मात्र आता येथील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो आहे मग यात हजारो, दुकाने, घरे आणि कंपन्यांमध्ये पाणी शिरून यावर्षी चार वेळा कोटयावधी रुपयांचा जबरदस्त आर्थिक फटका येथील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे.

दरम्यान गणेशाच्या आगमनापासून सुरु झालेला पाऊस सतत तीन दिवस पडत राहिल्यामुळे तालुक्यातील नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार या चारही शहरांमध्ये कमरे पेक्षाही अधिक पाणी साचले. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने हि पूरपरिस्थिती उद्भवली आहे. मुख्य रस्ते, दुकाने, तळमजल्यावरील घरे, चाळी, रेल्वे स्थानक, वीज मंडळाचे उपकेंद्रे, एस.टी.डेपो, शाळा, तलाव पाण्याने अक्षरश: भरून गेले.तर वसई-विरार स्थानका दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्ण बंद झाल्यामुळे लाखो प्रवाशांना दोन स्थानकां मधील तीन ते चार किमी अंतर रु ळावरून चालत पावसात भिजत कापावे लागले.

वसई डेपोत ही पाणी शिरल्यामुळे एसटी महामंडळाची ही सेवा कालांतराने थंडावली. महावितरणाच्या वसई उपकेंद्रात पाणी साचल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वसई, नालासोपारा आणि विरार मधील फिडर बुधवारी सकाळपासूनच बंद करण्यात आले.त्यामुळे तालुक्यातील 50 हजार ग्राहक आणि दोन लाखांहून अधिक नागरिक अंधारात होते. एकूणच ही परिस्थिती गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा निर्माण झाली असून यंदा वसई बुडणार नाही असा दावा करणाºया महापालिकेचे पितळ आता एकदा नाही तर चौथ्यांदा उघडे पडून देखील महापालिका प्रशासन व त्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना काहीही फरक पडलेला दिसून येत नाही. मुळातच वसई का बुडतेय याचा शोध घेवून त्यावर भविष्यातील व सद्यस्थितीतील उपाय सुचविण्यासाठी महापालिकेने नागरिकांचे १२ कोटी रु पये खर्चून केंद्र शासन पुरस्कृत निरी आणि आयआयटीची मुंबई अशी अभ्यासू यंत्रणा गतवर्षी राबवली होती. या दोन्ही संस्थांनी वसईतील पालिका क्षेत्रातील नाले, खाडयांची रु ंदी वाढवणे व काही अतिक्रमणे हटविण्याचा सल्ला दिला. मात्र निरीने दिलेल्या सल्ल्यानुसार कुठलीच कार्यवाही अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, त्यातच आजवर नाल्यांवरील अतिक्र मणे सुद्धा हटवली गेली नाही.

नियोजनशून्यता
तसेच नालेसफाई करून त्यातून काढलेला गाळ नाल्याजवळच ठेवला जात असल्याने हाच गाळ पुन्हा त्याच नाल्यात जमा झाल्यामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली असून, शिवसेनेच्या मते बोगस सत्यशोधन समिती आणि पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच वसई पुन्हा- पुन्हा बुडते आहे आणि तुंबतही असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे वसई शहर उपप्रमुख मिलींद चव्हाण यांनी केला आहे.


Web Title: Ignoring the report of the inspection, the Vasai-Virar flooded
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.