पत्नीला कंटाळून पतीची आत्महत्या

By Admin | Updated: May 23, 2016 02:17 IST2016-05-23T02:17:54+5:302016-05-23T02:17:54+5:30

आपल्या पत्नीचे मागील सहा वर्षापासून विवाहबाहय संबंध असल्याचे कळल्यानंतर वैतागलेल्या गुणवंत जाधव या वसई बँकेतील अधिकाऱ्याने पालघरच्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Husband sues his wife | पत्नीला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नीला कंटाळून पतीची आत्महत्या

हितेन नाईक,  पालघर
आपल्या पत्नीचे मागील सहा वर्षापासून विवाहबाहय संबंध असल्याचे कळल्यानंतर वैतागलेल्या गुणवंत जाधव या वसई बँकेतील अधिकाऱ्याने पालघरच्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्युपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनचे कॉस्टेबल गणेश वसईकर (५७) यांचे नाव असल्याने पालघर पोलीसांनी त्यांच्यासह सुमन जाधव यांना अटक केली आहे.
वसई जनता सहकारी बँकेतील वसई शाखेत डेप्युटी मॅनेजर असलेले गुणवंत जाधव हे पत्नी सुमन जाधव व २ मुलासह वसई येथील गौतम नगर (निर्मळ) येथे राहत होते. त्यांची पत्नी सुमन हीचे भुईगाव डोंगरी (वसई) येथे राहणारा व ठाणे येथील नौपाडा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेल्या गणेश गणपत वसईकर यांच्याशी सात वर्षापासून विवाहबाहय संबध असल्याचे कळल्यानंतर तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्याला आपली पत्नी मुले व सासऱ्याकडून त्रास होत असल्याने तो ३ वर्षापासून पालघर येथे एकटाच राहत होता. ९ मे रोजी त्याने आत्महत्या केली.

Web Title: Husband sues his wife