शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

तीन दिवस जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:11 PM

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला

ठाणे/पालघर : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. ते ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. त्यामुळे त्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश दिले.

या कालावधीत मच्छीमारांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये तसेच रजेवर असणाºयांनी हजर होण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, टीडीआरएफ, बांधकाम, आरोग्य अधिकारी आदी अधिकाºयांसह पोलीस अधिकारीदेखील या बैठकीला होते.रहिवाशांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करायावेळी चक्र ीवादळामुळे अतिवृष्टीचा अंदाज असून खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाºयालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पत्र्यांची, कच्ची घरे, झोपड्यांमध्ये राहणाºया नागरिकांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करणे, शेतकºयांनी काढून ठेवलेली पिके आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : चक्रीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी तीन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार