- शशी करपे, वसईजव्हार आणि मोखाड्यात सहाशेहून आदिवासी बालके मृत्युमुखी पडली असतांना लवाजम्यासह येऊन आदिवासींमध्ये दिवाळी साजरी करणे म्हणजे आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे.शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला घेऊन आदिवासीपाड्यांवर फराळ घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी येणार आहेत. त्यावर पंडितांनी टीका केल्याने दौरा वादग्रस्त झाला आहे.इथला पूर्ण आदिवासी समाज दु:खामध्ये असतांना महाजन यांना दिवाळी साजरी करण्याचे सुचते आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा आरोप पंडित यांनी लोकमतशी बोलताना केला. तुम्ही याठिकाणच्या रोजगार निर्मितीसाठी, भूक भागविण्याच्या योजनांसाठी इथला आदिवासी आक्रोश करीत आहे. आजही बीएएमएस डॉक्टर्स आणि अस्थायी डॉक्टरांच्या सेवेचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सहा-सहा महिने वेतन मिळत नाही. रोजगार हमी सेवकांच्याबाबतीतील तरतूद पूर्ण केलेली नाही. रोजगार पूर्ण करीत नाही. राज्य सरकार याठिकाणची भूक शमविण्यासाठी काहीही करीत नाही, असे असतांना फराळ घेऊन येणे निर्लज्जपणाचा कळस आहे, असा पंडित यांचा आरोप आहे. आदिवासींचे हे प्रश्न सोडवणार असाल तर दिवाळीत आदिवासींचा फराळ चाखायला याठिकाणी जरूर या, असेही पंडित यांचे म्हणणे आहे. याठिकाणी सरकारी वैद्यकीय महाविद्याले सुरु करणार का? आरोग्य केंद्रांमध्ेय कायमस्वरुपी डॉक्टर ठेवणार आहेत का? कंत्राटींना कोर्टाच्या निर्णयानुसार कायमस्वरुपी कामगारांइतका पगार आणि सोयी सुविधा देणार का? याची उत्तरे मंत्र्यांकडून अपेक्षित असल्याचे पंडित यांनी सांगितले. काय असेल मेनू?चवला आणि करांदं हा आदिवासींचा फराळ आहे. म्हणून भुकेने व्याकूळ असलेला इथला आदिवासी पारंपारिक फराळ घेऊन मंत्र्यांचे स्वागत करणार आहेत. व आपल्या मूलभूत प्रश्नांचा जाब मंत्र्यांना विचारणार आहेत, असेही ते म्हणाले.
भूक मिटवा, मग फराळ करा ?
By admin | Updated: October 28, 2016 02:28 IST