शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:02 AM2019-12-19T00:02:45+5:302019-12-19T00:05:45+5:30

बोट समुद्रात बुडाली : तांडेल यांचा सवाल

How can the government pay the debt? | शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

Next

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे शासनाकडून बोट बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ता भरणे शक्य नाही, त्यातच भाड्याने उत्तन येथे दिलेली ‘साई लक्ष्मी’ ही बोटही समुद्रात बुडाल्याने मालक अनिल काशीनाथ तांडेल यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला असून हे लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत मालक सापडला असून आपल्यावर आत्महत्येची पाळी ओढवल्याने शासनाने आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. दरम्यान, शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दरम्यान बोटीचे संपूर्ण नुकसान झाल्यास बोट मालकाला अवघे ९ हजार ६०० रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रयोजन आहे. इथे ३० ते ४० लाखाच्या रक्कमेची बोट आणि साहित्य असे नुकसान झाले असताना शासनाने आपल्यावरील कर्जाची रक्कम माफ करून पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणीही तांडेल यांनी शासनाकडे केली आहे.


सातपाटी येथे राहणारे अनिल काशीनाथ तांडेल यांनी शासनाच्या एनसीडीसी योजनेअंतर्गत २००७ मध्ये ११ लाख ५२ हजार १०० रुपयाांचे कर्ज घेतले. एकूण ९६ हप्त्यात दरमहा १२ हजार रु पये ८ वर्षात भरण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. बोटीला मासेच मिळत नसतानाही खलाशांचा वाढलेला पगार, डिझेल, जाळी, दोरखंड, बर्फाचे वाढते दर आदी बाबीमुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसतानाही त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे २ लाख ४४ हजार ९५३ रुपयांची रक्कम भरणा केली. त्यानंतर त्यांनी काही महिने आपली बोट बंदही ठेवली. त्यांच्या कर्जातील ९ लाख ७ हजार १४७ रु पयांची थकबाकी आणि भाग भांडवलाची ६ लाख २८ हजार ५०० अशी एकूण १५ लाख ३५ हजार ६४७ हजाराची निव्वळ थकबाकी बोट मालक अनिल तांडेल यांच्यावर असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी लोकमतला दिली. स्वत: पाटील यांनी आपल्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात ३३ वाव खोल पाण्यात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आपदग्रस्त मच्छीमारांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी ही बोट उत्तनच्या समोर समुद्रात मासेमारी करीत असताना वादळी वारे आणि महाकाय लाटेच्या तडाख्याने उलटली. तेव्हा ही बोट भाड्याने देण्यात आली होती. बोटीत असलेल्या तांडेल विजय बगाजी आणि विक्रमगडच्या दादडे पाड्यावरील १० आदिवासी खलाशी कामगारांनी समुद्रात उड्या घेतल्या.

८ - १० लाखांचे नुकसान
च्दुर्घटनेनंतर बोटीतील लाखो रुपयांची जाळी, ४०० लिटर्स डिझेल, ४५ हजाराचा वायरलेस सेट, ४० हजाराच्या बॅटऱ्या तसेच दुर्घटनाग्रस्त बोट आणण्यासाठी समुद्रात पाठविलेल्या बोटीच्या डिझेलचा दीड लाख खर्च असा सुमारे ८ ते १० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती संगीता बगाजी यांनी लोकमतला दिली.

शासनाने २०१७-१८ साली काढलेल्या नवीन शासन आदेशाप्रमाणे आपद्ग्रस्त
मच्छीमारांचे सर्व कर्ज माफ करून त्याचे पुनर्वसन करावे.
- राजन मेहेर, अध्यक्ष,
सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था

Web Title: How can the government pay the debt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.