बालमृत्यू रोखण्यासाठी झडपोलीमध्ये रुग्णालय
By Admin | Updated: April 15, 2017 03:08 IST2017-04-15T03:08:20+5:302017-04-15T03:08:20+5:30
डॉक्टर असतील तर औषध नाही, आणि दोन्ही असतील तर सामुग्री नाही अश्या वैद्यकीय सेवेच्या चक्र ात अडकलेल्या विक्र मगड, जव्हार, वाडा आदी तालुक्यातील

बालमृत्यू रोखण्यासाठी झडपोलीमध्ये रुग्णालय
- हितेन नाईक, पालघर
डॉक्टर असतील तर औषध नाही, आणि दोन्ही असतील तर सामुग्री नाही अश्या वैद्यकीय सेवेच्या चक्र ात अडकलेल्या विक्र मगड, जव्हार, वाडा आदी तालुक्यातील बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असताना जिजाऊ शैक्षणकि आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे मृत्यू थोपवून धरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इस्कॉन च्या मदतीने झडपोली येथे ३२ खाटांचे सुसज्ज असे रु ग्णालय उभारणीचे शिवधनुष्य त्याने पेलले असून आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्ना मधून हे रु ग्णालय उभारली जात आहे हे विशेष.
सामाजिक कार्यकर्ते सांबरे हे एका गरीब सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले असून केवळ जगायचे म्हणून जगायचे नाही तर आईबाबांना अभिमान वाटेल इतके मोठे व्हायचा निश्चय त्यांनी मनात दृढ केला होता. लहानपणा पासून घरात गरिबीचे चटके सोसल्यामुळे परिसरातील ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षण, पाणी, कुपोषण, आरोग्य आदी ज्वलंत समस्या त्यांना भेडसावत होत्या. अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे गरिबांचे जाणारे फुकटचे मृत्यू त्यांच्या मनाला वेदना देऊन जात होत्या.
गेल्या वर्षी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७ हजार ३२० मुले कुपोषित असल्याचा शासकीय आकडा होता. तो आता कमी झाला असला तरी मागच्या दहा महिन्यात तब्बल ४८२ बालके भूकंबळीने मृत्यू पावले आहेत. शासकीय रु ग्णालयात स्तनदामाता,बालमृत्यू चा आकडा सुद्धा मन सुन्न करणारा असल्याने हे मृत्यूचे दुष्टचक्र आपल्याला रोखायचे असल्याचे सांबरे ह्यांचे म्हणणे आहे.
वापी, सिल्वासाला नेताना होतो अनेकांचा मृत्यू
- झडपोली येथे उभारण्यात येत असलेल्या भगवान महादेव सांबरे ह्या ३२ खाटांच्या अद्यावत रु ग्णालयात पाच तज्ञ निवासी डॉक्टरसह महिला रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, दंतरोग तज्ञ तसेच कार्डिओ अम्ब्युलन्स, एक्सरे, लॅब, ओपीडी, फार्मसी आदी मूलभूत आरोग्य सेवेचा लाभ रु ग्णांना घेता येणार आहे.
- मुबई आणि वापी, सिल्वासा येथे रु ग्णांना नेताना उपचारा अभावी वाटेत होणारे मृत्यू काही प्रमाणात ह्यामुळं रोखून धरण्यात यश येणार असल्याचा विश्वास सांबरे ह्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.