इव्हीएमच्या प्रतिकृतीची केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:49 IST2019-06-18T22:48:46+5:302019-06-18T22:49:00+5:30
ईव्हीएम हटाव, संविधान बचावचे नारे; घंटानाद आंदोलनही केले

इव्हीएमच्या प्रतिकृतीची केली होळी
नालासोपारा : भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ईव्हीएमच्या निषेधार्थ त्याच्या प्रतिकृतीची होळी येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली. चंदननाका येथे इव्हीएम हटवा, संविधान वाचवा असा नारा देऊन आंदोलन करण्यात आले. तसेच झोपेचे सोंग घेणाऱ्या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी इव्हीएमची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्हा युवा अध्यक्ष प्रवीण गायकवाड याच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा युवा उपाध्यक्ष दीपक कांबळे, पालघर जिल्हा युवा महासचिव सॅमसन बळीद, पालघर जिल्हा युवा संघटन सचिव सुप्रेश खैरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.