दत्तक गावाची होळी ‘कोरडी’च!
By Admin | Updated: March 25, 2016 00:35 IST2016-03-25T00:35:11+5:302016-03-25T00:35:11+5:30
प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करेल त्याला दाम या तत्वाखाली रोजगार हमी योजना राबविली जात असली तरी, जव्हार तालुक्यातील धनोशी या गावातील गावकऱ्यांनी आकरा

दत्तक गावाची होळी ‘कोरडी’च!
जव्हार : प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करेल त्याला दाम या तत्वाखाली रोजगार हमी योजना राबविली जात असली तरी, जव्हार तालुक्यातील धनोशी या गावातील गावकऱ्यांनी आकरा महिने उलटले तरी केलेल्या कामाचे दाम मिळालेले नाही. विशेष म्हणजे कष्टकऱ्यांचे हे गाव आदर्श सांसद ग्राम योजने अंतर्गत असून खासदार चिंतामण वनगा यांना ते दत्तक दिले आहे.
आगोदरच पाऊस नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या वारली जमातीच्या गावाला आधार होता तो मजुरीच्या पैशाचा. गावातील जानू वरठा याला विचारले असता होळी निमित्त खरेदीच झाली नसल्याने गोडधोडाचा विषयच नव्हता असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. गावातील मजुरांनी ४ नंबर फार्म भरून येथील मजुरांना दोन दिवसातच रोजगार हमीवर कामे दिली होती. त्यावेळी धानोशी गावातील ११८ रोहयो मजूर, डोहारेपाडा ३६ मजूर, पालविपाडा ३५ मजूर असे एकंदरीत १८९ मजुरांनी कष्ट उपसले होते. रोजगार हमीवर तलावातील गाळ काढण्यासाठी, ग्रामपंचायतस्थरावर धनोशी गावात ई-मस्टर काढून, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ही कामे केली आहेत.
रोजगार हमीची ही कामे मे व जून महिन्यात करण्यात आली होती. मात्र रोजगार हमीवर कामे करून ११ महिने झाले तरीही मजुरांना रोजगार हमीच्या कामाची मजुरी नाही. कामे करून दिवाळी गेली, आता होळीही झाली परंतु मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचे कामिनी भामरा यांनी सांगितले.
- जव्हार तालुक्यापासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर असलेले धानोशी गांव हे खासदार- चिंतामण वनगा यांनी यांनी संसद ग्राम आदर्श गांव दत्तक गांव घेतले आहे. या गावाला दत्तक घेवून या धानोशी गावात रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रस्ते, लाईट, शिक्षण असा सुविधा करून देण्याचे वर्षभरापूर्वी घोषित केले होते. मात्र रोजगार हमीवर कामे करून ११ महिने उलटूनही मजुरी मिळत नसल्याची घर क से चालवायचे हा प्रश्न धनोशी मजुरांना पडला आहे.
खासदारांनी दत्तक घेतलेल्या धानोशी गावात रहाणाऱ्या आम्ही गावकऱ्यांनी रोजगार हमीवर काम केले आहेत. परंतु कामे करून दिवाळी नंतर होळीही झाली तरीही आम्हला केलेल्या कामाची मजुरी नाही.
- शांताराम पिलेना,
रोहयो मजूर धनोशी