हिंदू अल्पसंख्य होतील !
By Admin | Updated: March 30, 2016 01:16 IST2016-03-30T01:16:09+5:302016-03-30T01:16:09+5:30
देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष

हिंदू अल्पसंख्य होतील !
बोईसर : देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे दिला.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पालघर जिल्हा शाखेतर्फे बोईसर येथे विशाल हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र महाराज यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले संत तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह हजारो हिंदू उपस्थित होते.
डॉ. तोगडिया यांनी हिंदू शिक्षित व समृद्ध झाला पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदू मध्ये जागृती होऊन ते सक्रीय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तोगडिया यांनी हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसीडी, दिल्ली येथील डॉ. नारंग यांची हिंदू एरीयात झालेली हत्या, मुस्लीम समाजाला देण्यात येणाऱ्या सोयी व सवलती इ. विषयावर प्रखर टीका केलीे.
भारतात हिंदु हेच बहुसंख्य राहीले पाहिजेत ती काळाची गरज असून हिंदूच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सहा मुद्यांचा अॅक्शन प्लॅन सांगितला व जागरूक हिंदू बनण्याचे आवाहन केले अनेक मुद्दे त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेऊन आता यानंतर हिंदुंची संख्या घटणार नसून वाढेल असा आशावाद व्यक्त करून भारत हिंदू राष्ट्र है, और रहेगा ये हमारा नारा है, असे सांगितले.
नरेंद्र महाराजांनी हिंदु बांधवांनी धर्म, संस्कृती वाचविण्यासाठी स्वाभिमान बाळगून संघटीत झाले पाहिजे, मनशांतीसाठी धर्म जगवणे गरजेचे आहे.
आपली संस्कृती टिकवणे आवश्यक असून संस्कारशिवाय जीवनाला अर्थ नसल्याचे सांगितले तर अंधश्रद्धेचे ताडन केले जाते. काही एनजीओंना बाहेरून पैसा पुरवून हिंदु तरूण नास्तीक कसे होतील अशी कारस्थाने केली जातात. जेथे संस्कार विसरले जातात तेथे संस्कृती लयाला जाते असे सांगितले. त्यांनी संस्कारातून निर्माण झालेला सनातन हिंदू धर्म टिकविण्याचे आवाहन केले.