वसई विकास बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे
By Admin | Updated: August 25, 2015 22:45 IST2015-08-25T22:45:43+5:302015-08-25T22:45:43+5:30
पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत

वसई विकास बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे
वसई : पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत यांची निवड झाली.
वसई विकास सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये हेमंत म्हात्रे व जगदीश राऊत यांचे योगदान मोठे असून सदर बँकेने त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पुरस्कार प्राप्त केले. हेमंत म्हात्रे यापूर्वीही अध्यक्ष म्हणून निवडून आले होते तर गेली ५ वर्षे जगदीश राऊत यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. या दोघांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या १० वर्षात पूर्वीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यात शाखाचे जाळे विणले. या दोघांच्या निवडीचे भागधारक व सदस्यांकडून स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)