शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 07:33 IST

एनडीआरएफनं वैतरणेत उतरवली बोट, १६ तासांचा लढा झाला यशस्वी

हितेन नाईकपालघर : डोक्यावर धो-धो कोसळणारा पाऊस, पायाखाली पुराने वेढलेली वैतरणा नदी आणि समोर रात्रीचा काळाकुट्ट अंधार. अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन १० कामगार रात्रभर डोळ्यांत तेल घालून मदतीकडे आस लावून  कुडकुडत होते. समोर मृत्यू दिसत असतानाही कोणीतरी येईल आणि मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत आपल्याला घेऊन जाईल, हीच इच्छाशक्ती उराशी बाळगत त्यांनी सोळा तास निकराने लढा दिला आणि जगण्यासाठी सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष यशस्वी झाला. सकाळी एक बोट त्यांच्या दिशेने येताना दिसली आणि अगदी कंठाशी आलेल्या त्यांच्या जिवात जीव आला. देवदूतासारखे धावून आलेल्या एनडीआरएफच्या टीमनेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या दहा कामगारांची सुखरूप सुटका करीत शेवट गोड केेला.   

पालघरच्या वैतरणा नदीत बुधवारी रात्री अडकलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या १० कामगारांचा हा अनुभव थरारक असाच ठरला. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एनडीआरएफ टीमचे काम सुलभ झाल्याने कामगारांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. 

मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू असून, ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरने बहाडोली गावात मोठा प्रकल्प उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी खांब उभारण्याचे काम मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असतानाही सुरू होते.

कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची हीच जोखीम १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली. बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे, एनडीआरएफकडे असलेल्या साधनसामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीची मदतही  मिळू शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

स्थानिक पोलिसांचे सहकार्य महत्त्वपूर्णजिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर एनडीआरएफने नदीत बोटी उतरविल्या.

टॅग्स :Rainपाऊसpalgharपालघर