शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालघर जिल्ह्यात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:11 IST

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शासनाने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला असताना जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील नागरिकांनीही आपले दैनंदिन कामकाज, व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पालघर : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शासनाने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला असताना जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील नागरिकांनीही आपले दैनंदिन कामकाज, व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काही ठिकाणी या बंदला समिश्र प्रतिसाद लाभला असला तरी चौकाचौकात त्यांच्या प्रतिमेचे पुजन होताना पहावायास मिळाले.गुरु वारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्या मृत्यूचा संदेश आल्यानंतर सोशल मीडिया वरून त्यांच्या सोबत काढण्यात आलेले फोटो, त्यांच्या सहवासातील गोड आठवणी झळकू लागल्या. भाजपाच्यावतीन एक दिवस बंदच्या आवाहनाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपाई, बविआ, मनसे आदी पक्षांनी प्रतिसाद दिला. गुरुवारी रात्री पासून डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा,विक्र मगड, वाडा, पालघर, वसई तालुक्यातील रस्त्यात, चौकात त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे बोर्ड झळकू लागले होते.आठवडा बाजाराला फटकापालघर मधील आठवड्यात भरणारा शुक्र वार चा बाजार आज बंद मुळे भरला नसल्याने जिल्ह्या बाहेरून आपली उत्पादने विक्र ीस घेऊन आलेल्या शेकडो विक्र ेत्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.तर दुसरीकडे एसटी बसे, कारखाने सुरू असल्याने काही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने या सेवा बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.अटलजींच्या निधनाने तलासरीत बंदतलासरी : अटलिबहारी वाजपेयी यांना श्रद्धजंली देण्यासाठी तलासरी बाजार पेठे सह परिसरातील उधवा, धुंदलवाडी इत्यादी ठिकाणच्या बाजार पेठाही बंद ठेवण्यात आल्या. अटलजींच्या निधनाचे वृत्त कळताच भाजपाचे कार्यकर्तेही तलासरी पक्ष कार्यालयात जमा झाले. शुक्र वारी तलासरी भागात सर्वत्र अटलजींच्या निधनाने श्रद्धांजली चे बोर्ड लावण्यात येऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मनोर टेन परिसरात शुकशुकाटमनोर : वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच मनोर टेन परिसर कटेकोट बंद ठेवण्यात आले होते. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही ठिकाणी बंद ठेवण्यात आला होता. त्यांना श्रद्धाजली म्हणून भाजपाच्यावतीने भारत बंद ची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर टेन मनोर तसेच इतर ठिकाणी दिवसभर आपले व्यवसाय बंद केले होते. शुक्रवारी भाजीपाला, बाजार बंद असल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला होता.जव्हारकरांच्या आठवणीजव्हार : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त हाती येताच सर्वत्र शोकाकुल झाले. अटलिबहारी वाजपेयी हे जव्हारला २००४ साली आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे होते त्यावेळी त्यांनी आदिवासींचे पारंपरिक तारपा वाजवला होता. तसेच आज त्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जव्हारची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.मोखाड्यात शुकशुकाटमोखाडा : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजप सह सर्व पक्षीय पालघर जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला सर्वत्र प्रतिसाद दिला गेला असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी सर्वच दुकाने बंद होती. तसेच शासकीय सुट्टी असल्याने खेडोपाड्यातू कामानिमित्त येणाºया आदिवासी बांधवांची वर्दळ नव्हती. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत होता.कासा कडकडीत बंदकासा : तालुक्यातील कासा बाजारपेठे कडकडीत बंद पाळण्यात आला. माजी पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या निधनाने सर्व पक्षीय पालघर जिल्ह्यात बंद पूकार होता. त्या अनुषंगाने कासा बाजार पेठ सकाळपासुन बंद होती. प्रवासी वाहने ही बंद होती.चारोटी बाजरपेठ ही सकाळपासून बंद होतीविकमगड बाजारपेठ बंद ठेऊन दिली श्रद्धाजलीविकमगड : देशाचे माजी पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांचे गुरुवारी वयाच्या ९४ वषीँ निधन झाले. या निधनाची वार्ता समजताच सर्व समाज, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शोकाकुल झाला. या महामानवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी विक्रमगड पुर्णबाजारपेठ बÞंद ठेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व सर्व पक्षाच्या वतीन श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.अविरत देशसेवेचे व्रत घेतलेला नेता हरपला - विष्णू सवरावाडा: आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व देशाला समर्पित केलेला नेता आज आपल्यातून निघून गेला असून अटलजींच्या जाण्याने भाजपाची नव्हे तर देशाची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रि या राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली. अटलबिहारी वाजपेयी यांच गुरु वारी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.वाडा येथील भाजपा कार्यालयात त्यांना शुक्र वारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलतांना सवरा म्हणाले की, अटलजींच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली असून देशभक्त अजातशत्रू कवी व प्रसंगी कणखर नेतृत्व करणारे नेते होते. हे संपूर्ण देशाने अनुभवलेले आहे. आज अटलजी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरतील.यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण रोठे, अरविंद भानुशाली यांनी त्यांच्या आठवणी जागविल्या. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बाबाजी काठोले, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, पंचायत समिती जगन्नाथ पाटील यांसह भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संदीप पवार, वाडा नगर पंचायतचे नगरसेवक मनीष देहरकर व रीमा गंधे यांनी मनोगत व्यक्त करून अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.वाडा येथील भाजपा कार्यालयात अटलजींच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालघर जि. प. चे उपाध्यक्ष निलेश गंधे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश केने, उपतालुका प्रमुख तुषार यादव,वाडा नगर पंचायत नगर अध्यक्ष गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील, गटनेते संदीप गणोरे यांसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVasai Virarवसई विरार