जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात, सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:45 AM2019-02-20T05:45:20+5:302019-02-20T05:45:38+5:30

शिवरायांच्या आठवणींना उजाळा : शहरी व ग्रामिण भागात काढल्या शोभायात्रा, सांस्कृतिक गीत

Happy Birthday to Shivajianti, social media in the district | जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात, सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा

जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात, सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा

googlenewsNext

पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी सर्वत्र करण्यात आले होते. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध पंचायत समित्या, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाकडून मानवंदना देण्यात आली. या दिनानिमित्त अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे तसेच शोभा यांत्राचें आयोजन करण्यात आल हाते.

‘जी’ कार्यालयामार्फत शिवरायांना मानवंदना

पारोळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसई-विरार शहर महानगरपालिका, प्रभाग समिती ‘‘जी’’ कार्यालय, वालीव, वसई (पुर्व) येथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी प्रभाग समिती सभापती कन्हैया मनोहर भोईर, सहा. आयुक्त सुभाष जाधव, सामान्य प्रशासन अधिकारी पद्माकर गावळे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रभाकर धुमाळ, कनिष्ठ अभियंता समीर पाटील, स्वच्छता निरीक्षक विलीन पाटील तथा समस्त पदाधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार व फुले अर्पण करून मानवंदना दिली.
राज्यात किंवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात शिवरायांच्या शौर्याची व पराक्र माची ख्याती आहे. जागतिक पातळीवर त्यांच्या युद्धनिती व युद्धकौशल्याचा आजही अभ्यास केला जात असून अनेक प्रगत देशांच्या मुख्यालयात शिवरायांची प्रतिमा मानाने विराजमान आहे. शिवरायांनी उभारलेले गड-किल्ले आजही त्यांच्या पराक्र मांची अभिमानाने साक्ष देत आहेत.
आपल्या जिवनातील प्रत्येक नितीमूल्ये शिवरायांनी अखंडपणे जोपासली. जात-पात, भेदभाव न करता स्वराज्यासाठी स्वत:सोबत प्रत्येक मावळा घडवला. परस्त्री मातेसमान हा मूलमंत्र जपत त्यांनी सदैव स्त्रियांचा आदर सन्मान केला. गनिमीकाव्यातून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अजरामर असलेले स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे जितके ऐकायला सोपे आहेत तितकेच ते आचरणात आणणे कठीण आहेत. शिवरायांसारखी फक्त दाढी मिशी वाढवून, चंद्रकोर लावून किंवा त्यांच्यासारखा पेहराव परिधान करून कोणीही शिवाजी महाराज होऊ शकत नाही असे यावेळी सांगण्यात आले.

शिवरायांच्या मिरवणूकीमुळे जव्हारमध्ये वातावरण भगवे

च्जव्हार : संस्थांनकलीन जव्हार शहरात शिवजयंती निमित्त शिवप्रेमींनी ठिक-ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली. जव्हार नगरपरिषदेतर्फे यशवंतनगर मोर्चावरून शहरात भव्य मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली.
च्यशवंत नगर येथील टॉवर नक्यावर उपनागराध्यक्ष पद्मा गणेश राजपूत व माजी बांधकाम सभापती गणेश राजपूत यानी ढोल पथकांचे आयोजन करून वातावरणात रोमांच उभे केले. यावेळी नगरध्यक्ष पटेल यानी भगव्या झेंडा फडकवून शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तसेच, मुख्य अतिथि म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी व साध्याच्या मोखाडा तहसीलदार वसुमान पंत यांनीही पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्याधिकारी बोरीकर, नगरसेवक संकेत माळगावी, रहीम लुलिनया, जव्हारचे पोलिस निरीक्षक भोये, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटिल, शलाका आयरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जव्हार शहर परिसरात शिरपामाळ, यशवंत नगर मोर्चा, गांधीचौक, एसटी बस स्थानक परिसरातमध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम घेण्यात आल. रिक्षा, जीप, चालक मालक संघटना, अन्य शहरातील महत्वाच्या ठिकाणी शिव प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. गांधी चौकात नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व मुख्याधिकारी प्रशांत बोरकर यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महाराज होते कसे? त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन कशी केला? या विषयी मान्यवरांनी महाराजांच्या कर्तुत्वाला उजाळा देवून शिव जयंती निमित्त महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. शिवजयंती निमित्त जव्हार नगरपरिषदेतर्फे शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढली होती.
च्यावेळी तरुणांपैकी काहींनी घोड्यावर बसून मावळ्यांचे वेश तर एकाने शिवाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारली होती. ही मिरवणूक यशवंतनगर मोर्चा ते पाचबत्ती नाका, नगरपरिषद कार्यालय, गांधीचौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल पथक, महाराज डोली, असे कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
च्शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले होते तेव्हा, जव्हार शहरापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरपामाळ येथील माळरानावरील सर्वात उंच ठिकाण थांबले होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ’शिरपामाळ’’ टेकडी आहे. समिती त्यावेळी शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले. ते जव्हार शहराला लागून असलेले ठिकाण ‘’शिरपामाळ’’ आहे. येथे शिवजयंती निमित्त मंगळवारी शिवप्रेमींनी ध्वजारोहण केला. शहरात शिवप्रेमींनी गावभर मोटार सायकल रॅली काढली काढून वातावरण भगवे केले.

सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा
बोर्डी : विविध कार्यक्र मांच्या आयोजनातून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवभक्तांनी शुभेच्छा आणि शिवचिरत्राची माहिती व फोटो आदींची देवाणघेवाण केली. या दिनी डहाणू शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सकाळी शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्यानंतर मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले. शिवाय पुलवामा येथील शाहिद जवानांच्या समूर्तीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सागरनाका, रेल्वेस्थानक, मसोली, पारनाका या शहरातील विविध भागात मिरवणूक काढण्यात आली. तर सायंकाळी पारनाका येथील मैदानावर पुण्यातील शिव अभ्यासक सोमनाथ गोडसे यांनी व्याख्यान दिले. आदिवासी युवक मंडळ चिखले यांनी शिवाजी महाराज्यांचा स्मृतीला अभिवादन केले. येथे लहानशी शिवसृष्टी निर्माण करताना किल्ल्याची उभारणी केली होती. महाराजांचा वारसा सांभाळणाऱ्या संभाजी राज्यांची माहिती आणि त्यांच्या जीवनातील विशेष प्रसंग माहिती व फोटो भित्तीपत्रकाच्या माध्यमातून लावण्यात आली होती. शिवाय विद्यार्थी व महिलांकरिता रांगोळी स्पर्धा आयोजिल्याची माहिती अभिजित काटेला यांनी दिली. तर घोलवडच्या मरवडा मत्स्यमाता मंदिरानजीक कवियत्री वीणा माच्छी यांच्या नेतृत्वाखाली वस्तीतील लोकांनी अर्धाकृती शिवपुतळ्याला अभिवादन केले. सोशलमीडियावर शिवभक्तांनी आपले प्रेम व्यक्त केले.
 

Web Title: Happy Birthday to Shivajianti, social media in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.