वसईमध्ये घोरपडी वाढतायेत, शहरात होतोय वरचेवर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:49 AM2018-09-17T03:49:51+5:302018-09-17T03:50:05+5:30

अग्निशमन जवानांनी महिन्याभरात दोन घोरपडी पकडल्या; इतिहासात उल्लेख, दगडाला घट्ट पकडण्याची क्षमता

Growing gridly in Vasai, access to the city is very high | वसईमध्ये घोरपडी वाढतायेत, शहरात होतोय वरचेवर प्रवेश

वसईमध्ये घोरपडी वाढतायेत, शहरात होतोय वरचेवर प्रवेश

Next

नालासोपारा : इतिहासात तानाजीच्या ऐतिहासिक घोरपडीचे नाव ‘यशवंती’ प्रसिद्ध होते. मावळे तिच्या साहाय्याने सिंहगड चढले, असे म्हणतात. कातळाला किंवा जमिनीला घट्ट चिकटून राहण्याचा गुण घोरपडीत असतो. मॉनिटर लिझार्ट म्हणजेच घोरपड वसईत सद्या आढळून लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन वेळा वसईतील नागरी वस्तीतून दोन मोठ्या घोरपडी पकडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
पाल, सरडा, घोयरा यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कुळातील व्हॅरॅनल बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडींची जात भारतात सर्वत्र आढळून येते. वसईत चुळणे गावातील चुळणा गावात राहणाºया डॉमनीक घोन्साल्वीस यांना सोसायटी आवारात बुधवारी दुपारी दोन वाजता एक मोठी घोरपड आढळून आली. त्यांनी लागलीच पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून याबाबत कळवले. दलाचे जवान विराज म्हात्रे, जयेश भूटकुटे व सहकारी यांनी लागलीच चुळणे सोसायटी येथे धाव घेतली. आवारातील एका अडगळीच्या ठिकाणी ती लपली होती. जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कॅचरच्या सहाय्याने तीला पकडून सनसिटी येथील उपकेंद्रात नेली. त्यानंतर तीला वनविभाखाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी याच गावात एक मोठी घोरपड पकडण्यात आली होती. तिला वनविभाखाच्या ताब्यात देण्यात आले होते.
वसईची भौगोलिक परिस्थिती घोरपडीसाठी प्रतिकूल आहे. घोरपडीला उष्ण व ओलाव्याची हवा लागते. त्यामुळे हा प्राणी वसई किल्ल्यातही मोठ्या संख्येने आढळून येतो. जास्तीत जास्त लांबी पाच फुटापर्यंत असते.
घोरपड हा प्राणी दिसायला भयंकर असला तरी तो भित्रा असतो. मात्र संकटात सापडल्यास घोरपड मागील पायावर उभी राहते आणि अंग फुगवून मोठा आकार धारण करते. जोराने फुस्कारते, शेपटीचा तडाखा देते किंवा दातांनी चावा घेते. घोरपड जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये बिळात किंवा वाळवीच्या वारु ळात पंचवीस ते तीस अंडी घालते. अंडी घालून झाल्यावर ती पालापाचोळ्याने बीळ बंद करून निघून जाते. बिळातील उष्णतेमुळे अंडी उबतात.
घोरपड वेगाने पळू शकते. ती पळताना तिची शेपटी वर उचलते. घोरपड दिवसा शिकार करते. पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते. वसई येथील जंगली भागांमध्ये विविध जातींच्या घोरपड आढळतात. वसई किल्ला, अर्नाळा किल्ला तसेच जुने वाडे, काही दलदलीच्या ठिकाणी घोरपडी आढळून आल्या आहेत.

मासासाठी होते मोठ्या प्रमाणात शिकार
घोरपडीचे डोके धडाला एका मणक्याने जोडलेले असते. तिच्या शरीरावर बाह्यत्वचा असून काही जातीतील घोरपडींची त्वचा कठिण व जाड असते. घोरपडीची त्वचा साधारणत: खरबरीत व जाड असून हनुवटीच्या खाली बारीक त्वचा असते. तिचे दात तिक्ष्ण असून पायांची बोटे मोठी असतात.
शेपूट बारीक व लांब असते. हा प्राणी अत्यंत चपळ असतो. विशेष म्हणजे घोरपडीस पोहता येते. ती पोहताना तिच्या शेपटीचा उपयोग वल्ह्यासारखा करते. ती श्वास रोखून पाण्याखाली बराच वेळ राहू शकते. तिच्या शिराचा रंग हिरवट असतो. मात्र तिला शिकारीचा शाप आहे.

Web Title: Growing gridly in Vasai, access to the city is very high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.