शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

वाढवणविरोधात मोठा लढा; पालघरमधील सर्व संघटना एकत्र येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:11 AM

अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रकल्पांना विरोध

- हितेन नाईकपालघर : कायद्याने दिलेले पेसा, पाचवी अनुसूची आणि ग्रामसभेद्वारे दिलेल्या अधिकारान्वये विरोध दर्शवूनही केंद्र सरकार वाढवणसह अनेक प्रकल्प जिल्ह्यात लादू पाहात असल्याने आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र लढा उभारणार असल्याची घोषणा शनिवारी पालघर येथे झालेल्या सभेत करण्यात आली.वाढवण बंदराच्या विरोधात २२ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यानंतर रद्द करण्यात आलेल्या वाढवण बंदराची घोषणा केंद्र सरकारने करून त्याला तत्त्वत: मान्यताही दिली. या बंदराविरोधात प्रचंड जनाधार असतानाही भाजपचे केंद्र सरकार इथल्या शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांवर हे लादत असल्याने जनमानसातून प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाच्या विरोधात दिल्ली अथवा विधानसभेवर एक लाखापेक्षा जास्त संख्येने मोर्चा नेण्याबाबत आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने पालघर येथे एका सभेचे आयोजन केले होते. या सभेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता करबट, वाडवळ क्षत्रीय समाज अध्यक्ष अजय ठाकूर, कृती समितीच्या ज्येष्ठ नेत्या पूर्णिमा मेहेर, ज्योती मेहेर, रामकृष्ण तांडेल, सुभाष तामोरे, राजन मेहेर, अशोक नाईक, अशोक आंभिरे आदी उपस्थित होते.डहाणू प्राधिकरण सुप्रीम कोर्टात रद्द करण्याचा प्रयत्न केंद्र शासन करू पाहात असून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करण्याचा डाव आहे. समुद्रात कॉरिडॉर आणून, सीझेडएमपीद्वारे मच्छीमारांच्या जागा, घरे नकाशात समाविष्ट न करता आता वाढवण बंदर आणून मत्स्यसाठे असलेले गोल्डन बेल्ट नष्ट करण्याचा कुटील डाव केंद्र सरकार आखत असल्याने मच्छीमारांनी आता गाफील न राहता पेटून उठण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ मच्छीमार नेते सुभाष तामोरे यांनी व्यक्त केले. डहाणू प्राधिकरण हटविण्याचे भाजपच्या केंद्र सरकारचे प्रयत्न उच्च न्यायालयात बंदरविरोधी संघर्ष समितीने रीट याचिका दाखल करून हाणून पाडल्याचे सांगून केंद्र सरकारच्या उरात धडकी भरेल असा मोर्चा काढावा लागेल, असे वाढवण विरोधी संघर्ष समितीचे सचिव वैभव वझे म्हणाले. जिल्ह्यात लादण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे मच्छीमारांसह आदिवासीही भरडला जात असल्याचे एकता परिषदेचे दत्ता करबट यांनी सांगितले.तरुणांची ऊर्जा व ज्येष्ठांच्या अनुभवाची शक्तीवाढवण बंदरासह अन्य प्रकल्पांविरोधात तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचे अनुभव या जमेच्या बाजू मिळून एक शक्ती निर्माण करून मोठा लढा उभा करावा.- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना.वाढवण बंदरासाठी ६५ हजार कोटीची तरतूद केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी बदलासाठी कुठली परवानगी घेतलेली नाही.- नारायण पाटील, संघर्ष समितीचे अध्यक्षवाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा लढा लढण्याचे एकमताने ठरले असून जिल्ह्यातील सर्व संघटना तन-मन-धनाने एकत्र येणार आहेत.- लिओ कोलासो, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार कृती